तात्काळ वरीष्ठ अन्नधान्य वितरण अधिकारी यांना यंत्रणा सुधारण्याचे पत्र
अहमदनगर | ९ जानेवारी | प्रतिनिधी
(politics) रेशनकार्ड आणि त्यासंबंधित कामासाठी शहरातील नागरिकांना कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. सर्व्हर डाऊन झाल्याने ऑनलाईन प्रक्रिया ठप्प असल्याचे कारण ठोकून देत अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून नागरिकांना सतत वेठीस धरले जाते. याविरोधात शिवसेनेच्या युवा सेनेने मंगळवारी ता.७ रोजी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत रेशनिंग प्रक्रिया सुरळीत सुरू करण्याची मागणी केली.
शिवसेना युवासेनेचे युवा अधिकारी आनंद राठोड, कामगार सेनेचे शहर प्रमुख गौरव ढोणे, सुनिल भोसले आदींसह शिवसैनिकांनी अधिकारी यांना धारेवर धरले.
(politics) आठ दिवसात सर्व प्रक्रिया सुरळीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर तात्काळ वरीष्ठ अन्नधान्य वितरण अधिकारी यांना यंत्रणा सुधारण्याचे पत्र देण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली.
नवीन रेशन कार्ड काढणे, नवीन नावे समाविष्ट करणे अथवा नावे वगळणे, कार्डची ऑनलाईन नोंदणी करणे, कार्ड बदलून घेणे, नाव व पत्त्यात दुरुस्ती करणे असे विविध स्वरूपाची कामे अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून केली जातात. मात्र मागील काही महिन्यांपासून या कार्यालयात कामच होत नसून, आठ दिवसांनी या, पंधरा दिवसांनी या असे म्हणत अधिकारी-कर्मचारी नागरिकांना टोलवाटोलवी करतात. ऑनलाईन प्रक्रिया वरूनच बंद असल्याचे कारण दिले जाते. त्यामुळे अनेक नागरिक महिनो महिने या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. काही महिला, नागरिक तर वर्षभरापासून कामानिमित्त या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.
जिल्ह्यातील इतर ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने रेशनकार्ड संदर्भातील नागरिकांची कामे केली जातात. मात्र शहर अन्नधान्य कार्यालयाकडून ऑफलाईन कामे तर बंद असून, ऑनलाईन कामेही विविध कारणे देऊन टाळली जात आहेत. रेशनकार्ड संबंधी काही किरकोळ कामेही होत नसल्याने या कार्यालयाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना युवासेनेचे युवा अधिकारी आनंद राठोड, कामगार सेनेचे शहर प्रमुख गौरव ढोणे, सुनिल भोसले शिवसेनेचा झटका दिला. आंदोलनात कामानिमित्त आलेले त्रस्त नागरिकही सहभागी झाले.
हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ