इंडिया बुल्स कंपनीला दिलेली जमीन लवकरात लवकर परत घ्यावी, तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा – सत्यजीत तांबे

नाशिक | प्रतिनिधी

सिन्नरमधील इंडियाबुल्स प्रकल्पाची जागा एमआयडीसीला परत देण्याबाबत, तसेच नाशिकसह राज्यातील सहकारी औद्योगिक वसाहतीं मधील प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली, अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, सिन्नर तालुक्यामध्ये मोठा भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून इंडियाबुल्स कंपनीच्या ताब्यात आहे. या भूखंडावर कंपनीने कोणताही उद्योग उभा न केल्याने उत्तर महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. हा भूखंड इतर कंपन्यांना मिळावा, याठिकाणी उद्योगधंदे निर्माण व्हावेत व तरुणांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी गेल्या एक वर्षापासून मी सातत्याने लढा देतोय.

आजच्या बैठकीतही इंडिया बुल्स कंपनीला दिलेली जमीन लवकरात लवकर परत घ्यावी, तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावे, अशी आग्रही भूमिका मी मांडली. युवकांच्या रोजगारासाठी सुरू असलेला हा लढा विजयापर्यंत सुरूच असेल, असे सत्यजीत तांबे म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *