भिवंडी | गुरुदत्त वाकदेकर | २८.६.२०२४
येथील स्वराज्य तोरण चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप यांच्या सहकार्याने भिवंडी पत्रकार महासंघ आयोजीत दैनिक स्वराज्य तोरण कार्यालय कैलासनगर वळपाडा येथे पत्रकारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ. किशोर बळीराम पाटील, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ. मनिलाल रतीलाल शिंपी, भिवंडी पत्रकार महासंघाच्या सल्लागार संध्या पवार, राजेंद्र काबाडी, भिवंडी पत्रकार महासंघाचे सचिव अफसर खान, खजिनदार आचार्य सुरजपाल यादव, भिवंडी पत्रकार महासंघाचे सदस्य सोमनाथ ठाकरे, सी. पी. तिवारी, निलम तिवारी, श्रीनिवास सिरीमल्ली, मेहंदी हसन, संतोष सोनी, संदीप गुप्ता, रवी तिवारी, संतोष पांडे, सुमित घरत, रमण पंडीत, सुदर्शन पाल आदी पत्रकार उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून मी पत्रकारांना एकत्र करून पावसाळ्यात रेनकोटचे वाटप स्वराज्य तोरण चॅरीटेबल ट्रस्ट व इतर स्वंस्थांच्या माध्यमातून करत असतो. कारण माझ्या सर्व पत्रकार बंधु भगिनींना रेनकोटमुळे पावसात वृत्तांकन करणे सोपे जाते तसेच या निमित्ताने सर्वांना एकत्र करून पत्रकरीतेबद्दल सर्वांच्या विचारांची देवाण घेवाण होते. याचा फायदा सर्वांना होतो. म्हणूनच भिवंडी पत्रकार महासंघाची स्थापना केली आहे. जेणे करून कोणत्या ना कोणत्या कारणाने सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते असे भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ. किशोर पाटील यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसर खान यांनी केले तर आभार प्रदर्शन आचार्य सुरजपाल यादव यांनी केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.