पुणे | ३.६ | रयत समाचार
(Education) कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे तंत्रज्ञान आज मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनत असून शिक्षण, उद्योग, व्यवसाय, आरोग्य, प्रसारमाध्यमे आणि दैनंदिन व्यवहारांवर त्याचा मोठा प्रभाव पडत आहे. मात्र एआयबाबत अनेकांच्या मनात भीती, गैरसमज आणि विविध शंकाही आहेत. या पार्श्वभूमीवर एआयचे वास्तव स्वरूप, त्याचे फायदे-तोटे आणि भविष्यातील संधी यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुण्यात विशेष माहितीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
(Education) ‘सृष्टी’ संस्था आणि श्री महावीर जैन विद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओळख एआयच्या अनोख्या विश्वाची’ या विषयावरील माहितीपर कार्यक्रम शुक्रवारी ता.५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
(Education) या कार्यक्रमात वेब व मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी अभ्यासक, लेखक, कवी, संपादक, गजलकार आणि शब्दकोश निर्माते प्रसाद शिरगावकर हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. एआयमुळे होणारे बदल, रोजगाराच्या नव्या संधी, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर आणि भविष्यातील आव्हाने याविषयी ते सविस्तर माहिती देतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव हे असणार आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षण क्षेत्रात एआयची भूमिका आणि नव्या पिढीसमोरील संधी यावर प्रकाश टाकला जाणार आहे.
हा कार्यक्रम श्री महावीर जैन विद्यालयाच्या आधुनिक ‘बीएमएस’ सभागृहात म्हणजे बीएमसीसी शेजारी, गोपाळ गणेश आगरकर रस्ता, पुणे- ४११००४ येथे होणार असून, एआयविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री महावीर जैन विद्यालयाचे सचिव युवराज शहा, सृष्टी संस्थेचे अध्यक्ष सचिन नाईक आणि संस्थापक प्रशांत कोठडिया यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या माहितीसत्राची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत. एआय म्हणजे नेमके काय? एआयचे फायदे आणि धोके. शिक्षण व रोजगार क्षेत्रातील परिणाम. दैनंदिन जीवनातील एआयचा वापर. तज्ज्ञांशी थेट संवादाची संधी.
‘एआयला घाबरू नका, त्याला समजून घ्या’ हा संदेश देणारे हे प्रबोधनात्मक सत्र सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
