मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २०.६.२०२४
यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस शरद काळे यांचे ३१ मार्च २०२३ रोजी दुःखद निधन झाले. प्रदीर्घ सनदी सेवेतील निवृत्तीनंतर ते जवळपास दोन तप यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने चव्हाण सेंटरतर्फे ता. २५ जून २०२४ रोजी सायं. ५ ते ७ या वेळेत चव्हाण सेंटर, मुंबई येथे सुप्रसिद्ध समाजसेवक व विचारवंत डॉ. अभय बंग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. बंग सर्च या संस्थेमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन कार्य करतात. या स्मृती व्याख्यानाच्या आयोजनामध्ये शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रथम’ ही स्वयंसेवी संस्था तसेच एशिॲटीक सोसायटी ऑफ मुंबई यांचाही पुढाकार आहे. शरद काळे यांच्या स्मृती व्याख्यानास विविध स्तरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बंग यांच्या व्याख्यानाचा व चर्चेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.