नगर तालुका (प्रतिनिधी) १४.६.२०२४
विसापूर तलावात सध्या पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे. त्यामुळे घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अत्यंत गढूळ व पिण्यास अयोग्य पाणी पुरवठा होत आहे. खंडाळा, बाबुर्डी घुमट, वाळकी, खडकी, सारोळकासार, घोसपुरी, हिवरेझरे, वडगाव, तांदळी, जाधववाडी या गावांना दूषित पाणीपुरवठा झाला. या पाण्यामुळे नागरिकांना पोटाचे, साथीचे आजार होण्याचा मोठा धोका आहे. सध्या कुकडीचे आवर्तन सुरु आहे तरी विसापूर तलावात तातडीने गढूळ पाणी येणार नाही याकरिता कुकडीचे पाणी त्वरित सोडावे किंवा या गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावेत, अन्यथा पुढील आठवड्यात नगर दौंड रोडवर महिला भगिनींसह रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील. या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, रामदास भोर, पोपट निमसे, राम भालसिंग मेजर, जनार्धन माने, प्रवीण कोठुळे, भाऊसाहेब काळे, हंडोरे, काळे आदी उपस्थित होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.