प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्यासाठी जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

PSX 20240612 175001

मुंबई (प्रतिनिधी) १२.६.२४

‘हर घर नलसे जल’ या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्यासाठी राज्यात सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालय येथील आढावा बैठकीत दिले.

जलजीवन मिशनबाबत आढावा बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन, सहसंचालक श्रीकांत अनारसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *