जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) यांच्या सहकार्याने वाढवण बंदर स्थापित

मुंबई (प्रतिनिधी) २०.६.२०२४

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे ७६,२०० कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास आज मंजूरी दिली. काम पूर्ण झाल्यानंतर हे जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक असेल.

या प्रकल्पाची अंमलबजावणी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) यांच्या सहकार्याने स्थापित वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) द्वारे केली जाईल.

या प्रकल्पात १००० मीटर लांबीचे ९ कंटेनर टर्मिनल्स, ४ लिक्विड कार्गो बर्थ, १ रो-रो बर्थ, १ तटरक्षक धक्का आणि ४ बहुउद्देशीय धक्के यांचा समावेश असेल. प्रकल्पामुळे दरवर्षी २९८दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) संचयी हाताळणी क्षमता आणि २३.२ दशलक्ष TEUs कंटेनर हाताळणी क्षमता निर्माण होईल.

यासोबतच, १४४८ हेक्टर क्षेत्राचे पुनर्वसन, १०.१४ किमी ऑफशोअर ब्रेकवॉटर आणि कंटेनर/कार्गोद स्टोरेज क्षेत्रांचे बांधकाम करण्यात येईल. प्रकल्पामुळे दरवर्षी २९८दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) संचयी हाताळणी क्षमता आणि २३.२ दशलक्ष TEUs कंटेनर हाताळणी क्षमता निर्माण होईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *