कोल्हापूर | प्रतिनिधी
येथील खा. छत्रपती शाहू महाराज यांनी बलिदान दिनानिमित्त पन्हाळगडावरील शिवा काशीद यांच्या समाधीचे आज दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खा. धैर्यशील माने, मा. आ. चंद्रदीप नरके, समरजीतसिंह घाटगे आदींसह असंंख्य शिवभक्त उपस्थित होते.
‘शिवा म्हणून जगलो तरी शिवाजी राजे म्हणून मरतोय!’ असे उद्गार काढून आजच्याच दिवशी स्वराज्याच्या अखंडतेसाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती वीर शिवा काशीद यांनी दिली होती.
वीर शिवा काशीद यांच्या बलिदानामुळेच छत्रपती शिवराय सुखरूप विशालगडावर पोहोचू शकले आणि स्वराज्याची स्थापना नव्याने करू शकले. त्यांच्या बलिदानाला इतिहासात अनन्यसाधारण महत्व असून शतकानुशतके आम्ही त्यांचे ऋणी राहू, असे ते यावेळी म्हणाले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.