अहमदनगर (प्रतिनिधी) २०.६.२०२४
इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाइन अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच आय.एस.डी.टी. संस्थेच्या फॅशन डिझायनिंग व इंटेरियर डिझायनिंग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन ‘स्वानुभव : २०२४’ चे आयोजन येत्या शनिवारी ता २२ व रविवारी ता. २३ रोजी सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेच्या संचालिका पूजा देशमुख यांनी दिली.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्याशी संलग्न असलेल्या आय.एस.डी.टी. संस्थेमार्फत प्रतिवर्षी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी २२ जून रोजी सकाळी ९ वाजता दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन आर्किटेक्टचे अध्यक्ष आर्कि. प्रल्हाद जोशी व इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्सचे अध्यक्ष अजय अपूर्वा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आय.एस.डी.टी.चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव देशमुख हे भूषविणार आहेत,असे प्राचार्य आर्किटेक्ट अरुण गावडे यांनी सांगितले.
प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना संचालिका पूजा देशमुख यांनी सांगितले की, सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुले असून फॅशन डिझाईन व इंटरियर डिझाईन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरणार आहे. आय.एस.डी..टी.चे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थी लगेचच अर्थाजन करू शकतात, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. इयत्ता दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षात आपले उज्वल भवितव्य घडविण्याची संधी यानिमित्ताने आय.एस.डी.टी.ने उपलब्ध करून दिली आहे.
या प्रदर्शनात फॅशन डिझाईन विभागात विद्यार्थ्यांनी तयार केलेले लहान मुलांचे फ्रॉक्स, स्कर्टस, पार्टी वेअर असे कपडे, महिलांसाठी स्कर्टस, शर्ट्स, डिझायनर आऊटफिट्स, हँडमेड ज्वेलरी, हॅन्ड पेंटेड दुपट्टा, जॅकेट्स, ॲक्सेसरीज यांचे सादरीकरण करण्यात आले असून अत्यंत माफक दरात या कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे इंटेरियर डिझाईन विभागात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या निवासी व व्यावसायिक डिझाइन्सचे व प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य आर्किटेक्ट अरुण गावडे यांनी दिली.
प्रदर्शन आय.एस.डी.टी., निर्मल चेंबर्स मागे, होर्मो केअर लॅबसमोर, लालटाकी, अहमदनगर (०२४१) २४३००२३ येथे आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य प्रदर्शनास विद्यार्थी, पालक, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, इंटेरियर डिझायनर्स, कॉन्ट्रॅक्टर्स व कलारसिक नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आय.एस.डी.टी. या संस्थेच्या वतीने करण्यात आले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.