अहमदनगर | २७ जुलै | मिरर न्यूज
(World news) डायरिया हा लहान मुलांमध्ये मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण असून, जागतिक पातळीवरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. भारतीय बालरोग तज्ञ संघटनेच्या वतीने (ओरल रिहायड्रेशन सॉल्युशन) व झिंकच्या माध्यमातून डायरियावर जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
(World news) ओआरएस आणि झिंक हे डायरियामुळे होणाऱ्या बहुतांश मृत्यू टाळण्यासाठी प्रभावी उपाय आहेत. प्रत्येक पालकाच्या घरात हे जीवनरक्षक उपाय पोहचविण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खळदकर यांनी दिली.
(World news) ओआरएस म्हणजे काय? ते इतके महत्त्वाचं का आहे? ओआरएस म्हणजे साखर व मीठाच योग्य प्रमाणात बनवलेले द्रावण, जे शरीरातून कमी झालेले पाणी व क्षारांची भरपाई करतो. डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास ७०% मृत्यू हे निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) होतात. डब्ल्यूएचओ व लॅनसेटसारख्या संस्थांनी ओआरएसला शतकातील सर्वात मोठी वैद्यकीय क्रांती असे संबोधले आहे. डब्ल्यूएचओ सध्या फक्त ओआरएसचा वापर सुचवतो, जो जलदगतीने सोडियम व पाण्याचे शोषण करतो आणि उलटी, जुलाब याचे प्रमाण कमी करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ओआरएस घरीच तयार करण्याची पद्धत म्हणजे १ लिटर उकळवून थंड केलेले पाणी घ्या (सुमारे ५ कप), त्यात ६ चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाका. या मिश्रणाला नीट ढवळून रूग्णाला पाजावे. इतर घरगुती पर्याय म्हणून डाळीचे पाणी, तांदळाचे पाणी, लिंबूपाणी (कमी साखर व मीठ टाकून), नारळपाणी, मठ्ठा (मीठ टाकलेला), भाज्यांचे सूप यांचा देखील समावेश आहे.
झिंक देखील तितकेच महत्त्वाचे असून, डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शनानुसार १४ दिवस झिंक सप्लिमेंट्स देणे आवश्यक आहे. झिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो व पुन्हा डायरिया होण्याचे प्रमाण कमी करतो. लहान बालक जर दूध-पाणी पित नसेल, सुस्त किंवा बेशुद्ध वाटत असेल, रक्तयुक्त स्त्राव दिसत असेल, ताप, सतत झोप घेत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे डॉ. वसंत खळदकर यांनी म्हटले आहे.
भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे ४५ हजारांहून अधिक बालरोगतज्ज्ञ देशभर ओआरएस व झिंक जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. डायरिया झाल्यास प्रत्येक वेळी ओआरएस वापरणे म्हणजे, आयुष्य वाचवण्यासारखे आहे. जनजागृती हे सर्वात मोठे औषध आहे. डायरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी घराघरात ओआरएस आणि झिंक पोहोचवणे ही काळाची गरज आहे. यासाठी भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची मोहिम सुरु करण्यात आली आहे.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.