अहमदनगर | २३ जून | प्रतिनिधी
(World news) येथील तरुण संशोधक अभिषेक चावला यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. त्यांच्या “Human Activity Recognition in Videos using Deep Learning with Inflated 3D Model” या संशोधन प्रकल्पाची निवड प्रतिष्ठित अमेरिकन संस्था AIP Publishing (American Institute of Physics) यांनी जागतिक स्तरावर प्रकाशनासाठी केली आहे. हा प्रकल्प आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरतो आहे.
(World news) AIP ही संस्था विज्ञान आणि भौतिकशास्त्र विषयातील संशोधन, परिषदा आणि माहितीचा खजिना मानली जाते. तिचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये असून पाच आघाडीच्या भौतिक विज्ञान संस्थांची ती भागीदार आहे, ज्यात American Physical Society, Optica, Acoustical Society of America, Society of Rheology आणि American Association of Physics Teachers यांचा समावेश आहे.
(World news) अभिषेक चावला यांचे शिक्षण अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण आष्टी व दिल्ली येथे झाले. नंतर बी.पी.एच.ई. सोसायटीच्या अहमदनगर कॉलेजमधून पुढील शिक्षण घेत त्यांनी तामिळनाडूतील करुण्या युनिव्हर्सिटी, कोयंबतूर येथून कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक ही पदवी प्रथमश्रेणीतून संपादन केली.
