Women: सकारात्मक राहणे, निराश न होणे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फार महत्त्वाचे – कवयित्री, लेखिका विद्याराणी मलवडकर

69 / 100 SEO Score

सातारा | ४ सप्टेंबर | रावसाहेब राशिनक

Women ‘मायेचा स्पर्श आणि प्रेमळ बोल यांची गरज सगळ्यांनाच असते. हे जीवन सकारात्मकतेने जगणे, निराश न होणे हे आयुष्याच्या टप्प्यावर फार महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कवयित्री, लेखिका, ‘साहित्य कस्तुरी’ व्यवस्थापकीय संचालिका विद्याराणी मलवडकर यांनी केले. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मणिबेन एमपी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभाग, जी.ओ.शाह ग्रंथालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शारदोत्सव २०२४’ अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार’ मालेच्या तिसऱ्या दिवशी मलवडकर यांनी ‘मायेचा कानमंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी अनुभव व आठवणींना उजाळा देत अवास्तव अपेक्षा न बाळगल्यास स्वतःचा प्रवास अविरत सुरू ठेवणे गरजेचे आहे, असा कानमंत्र दिला. चांगली व्यक्ती म्हणून जगण्यासाठी माणुसकी जपण्याची शिकवण त्यांनी यावेळी दिली. आई-वडिलांचा आदर करावा. चांगली संगत ठेवा आणि महत्त्वाचे म्हणजे आत्मनिर्भर व्हा असेही सांगितले.

ऑनलाईन कार्यक्रमात मार्गदर्शकांची ओळख प्रा.सुप्रिया शिंदे-टाकळे यांनी करून दिली. सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन डॉ.रश्मी शेट्ये- तुपे यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *