अहमदनगर | १७ सप्टेंबर | रयत समाचार
(Women) राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलनाच्या काव्य स्पर्धेत पाथर्डी येथील मेहेक वाणी यांनी यश मिळवले. संमेलनात अनेक कवींनी सहभाग घेतला. त्यातून मेहेकने तिसरा क्रमांक पटकावला.
(Women) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेच्या वतीने युवा साहित्य व नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात राज्यभरातील नवकवींसह ज्येष्ठ कवी सहभागी झाले होते. या संमेलनानिमित्त काव्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात मेहेकने ‘शर लागलेल्या पाडसाची किंचाळी आठवते’ ही कविता सादर केली. त्यामुळे तिची निवड निमंत्रितांच्या काव्य संमेलनासाठी झाली होती.
(Women) चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, भरत दौंडकर, गुंजन पाटील, अंजली कुलकर्णी या दिग्गज कवींना निमंत्रित करण्यात आले होते. वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. त्यात सहभागाची मेहेकला संधी मिळाली. संमेलनाध्यक्ष गौरी देशपांडे व मसापचे मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कार्यवाह जयंत येलुलकर उपस्थित होते. तिच्या कवितेचे उपस्थितांनी कौतुक केले.
