नगरतालुका | १ ऑक्टोबर | समीर मनियार
Sports नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये नगर तालुक्यातील सोलापूर रोडवरील नारायणडोह येथील नालंदा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून विद्यालयाचे नाव चमकवले. कु. ग्रेसी दैमारी, कु. तनिष्का सपकाळ, कु. कीर्ती महार यांनी टेबल टेनिस संघामध्ये प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले. जिल्हा चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर विभागस्तरावर संघाची निवड करण्यात आली. अश्विन गीते यांने ज्यूडोमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. हॉलीबॉल संघाने (वयोगट १७) दुसरा क्रमांक पटकावला तर वयोगट १४ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.
विद्यालयाचे शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक शादाब मोमीन, विद्यालयाचे प्राचार्य व क्रीडाशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यालयाच्या वतीने विजेत्या खेळाडूंचे विद्यालयाच्या संचालिका पल्लवी बहादुर्गे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.