अहमदनगर | प्रतिनिधी
येथील जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ.संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार सचिव प्रा.डॉ.पै. संतोष भुजबळ यांच्या हस्ते कुस्तीगीर संघाच्या नगर तालुकाध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र केसरी पै.युवराज करंजुले तर शहराध्यक्षपदी पै.शिवाजी चव्हाण यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पै. काका शेळके उपस्थित होते.
यावेळी संतोष भुजबळ म्हणाले की, कुस्ती खेळाला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने तालुकाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन केले जाईल आणि युवकांना कुस्ती खेळासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण होईल. आता क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत तरी जास्तीत जास्त युवकांनी कुस्ती खेळाकडे वळावे पै.शिवाजी चव्हाण यांच्या माध्यमातून भिस्तबाग चौक येथे छत्रपती संभाजी राजे कुस्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले.
हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.