अहमदनगर | २० जून | प्रतिनिधी
(Social) नगर परिसरातील मान्यवर नागरिक उदय भाऊसाहेब झावरे यांचे गुरुवारी ता. १९ जून २०२५ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर कोणताही धार्मिक विधी आयोजित करण्यात आलेला नाही.
(Social) स्व. झावरे हे एक प्रगल्भ विचारांचे, मृदू स्वभावाचे आणि सामाजिक क्षेत्रात आपली छाप उमटवणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या जीवनात नेहमी साधेपणा आणि माणुसकीची कास धरली.
(Social) झावरे कुटुंबियांच्या वतीने, रविवारी ता. २२ जून २०२५ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत, स्मृती बंगला, आगरकर मळा, स्टेशन रोड, अहमदनगर येथे एक अनौपचारिक श्रद्धांजली भेट कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या भेटीत कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्र परिवार व सर्व परिचितांनी सहभागी होऊन स्व. उदय झावरे यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणतेही धार्मिक विधी वा पारंपरिक कार्यक्रम होणार नाहीत. फक्त मनापासूनची एक भेट आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची एक संधी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे नंदकुमार झावरे, प्रकाश झावरे, डॉ. सागर झावरे, राहुल झावरे, प्रसाद झावरे, क्षितिज झावरे कुटुंबियांच्या वतीने कळविण्यात आले.
