Social | आकाशवाणी निवेदकांनी केला सुदाम बटुळे यांचा सन्मान

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | रयत समाचार

(Social) येथील आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे यांची पदोन्नती होऊन कार्यक्रम अधिकारीपदावर नियुक्ती झाली. त्यांच्या यशाबद्दल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे हंगामी निवेदक किरण डहाळे, अतुल सातपुते व आदिनाथ अन्नदाते यांच्यावतीने सुदाम बटुळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आकाशवाणी कार्यालयात सत्कार करण्यात आला.

(Social) बटुळे आपल्या कार्यक्रम अधिकारीपदाच्या कार्यकाळात श्रोत्यांसाठी नवनवीन कार्यक्रमांची निर्मिती करून श्रोत्यांसाठी नक्कीच दर्जेदार कार्यक्रम देतील, अशी अपेक्षा निवेदक किरण डहाळे यांनी यावेळी व्यक्त केली.

(Social) सत्काराला उत्तर देताना बटुळे यांनी आगामी काळात श्रोत्यांसाठी काही नवीन कार्यक्रम करण्याचा मानस असल्याचे सांगितले. तसेच कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करतांना आपल्या सर्वांचे असेच सहकार्य आवश्यक आणि अपेक्षित आहे. जेणेकरून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व श्रोत्यांना चांगल्या गोष्टी आपण देऊ शकू आणि खऱ्या अर्थानं ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीच ब्रीदवाक्य आपल्याला सार्थक ठरवता येईल, असेही बटुळे यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी हंगामी कार्यालयीन सहाय्यक वृषाली घनवट उपस्थित होत्या.

Share This Article