राजेंद्र देवढे । विशेष प्रतिनिधी
(Social) पाथर्डी तालुक्यातील, मोहोज देवढे येथील वारकरी संप्रदायाचे पाईक राधाकिसन देवढे यांचे सुपुत्र शंकर देवढे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत, विद्युत सहायकपदी निवड झाली आहे. भारतीय सेनेत योगदान दिलेल्या भूमिपुत्राची या पदावर निवड झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठीही शुभेच्छा दिल्या.
(Social) शंकर राधाकिसन देवढे हे २००२ साली आर्मीत भरती झाले. त्यांना बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप पुणे येथे ट्रेनिंग सेंटर मिळाले. फिजिकल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना इलेक्ट्रिशियन ट्रेड मिळाला. ट्रेड ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर ११८ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये फिरोजपुर पंजाब येथे पोस्टिंग मिळाली. ११८ इंजिनियर रेजिमेंटमध्येच १७ वर्षे देशसेवा करून ते सुखरुप घरी पोहोचले.
(Social) सेवानिवृत्तीनंतर त्यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीची परीक्षा दिली. ती परीक्षा ते यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले व महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीत, विद्युत सहाय्यक पदी त्यांची निवड झाली आहे.
शंकर देवढे यांच्या घराला उत्तम संस्कारांची पार्श्वभूमी असल्याने तेच संस्कार जपत आजवर त्यांनी त्यांची वाटचाल केली आहे. त्यांचे पिताजी राधाकिसन देवढे हे सदैव परमार्थात लीन असतात. तसेच त्यांचे थोरले चुलते वैकुंठवासी रावसाहेब देवढे हेेसुद्धा पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते व दुसरे चुलते दत्तात्रय देवढे हे प्रगतीशील शेतकरी आहेेत. त्यांचे थोरले बंधू कांताबापू देवढे हे प्रख्यात भजन गायक असून त्यांनी आकाशवाणीवरही गायन केले आहे. अशा उत्तम गुणांनी युक्त घरातील सुपुत्र शंकर देवढे यांची विद्युत सहायकपदी निवड झाल्यामुळे वीज ग्राहकांच्या घरांत सातत्याने प्रकाश व शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्यात सुरळीतपणा आल्याशिवाय राहणार नाही.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
