अहमदनगर | रयत समाचार
(Social) अर्बन बँक बचाव समितीने केलेल्या अखंड पाठपुराव्यामुळे ज्येष्ठ नागरिक, असहाय, आजारी महिलांसह सर्व ठेवीदारांच्या ५०% ठेवी मिळाल्या आहेत, पुढच्याही मिळणार आहेत. हा एकजुटीचा विजय आहे. भारतात आपली अर्बन बँक एकमेव बँक अशी आहे ज्यांच्या ठेवी परत मिळत आहेत. याचे सर्व श्रेय बँक बचाव समितीचे आहे.
(Social) त्यामुळे शनिवार, ता.९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगर अर्बन बँक मुख्यालयासमोर ठेवीदार महिलांच्यावतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लढावू भावांच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तरी सर्व ठेवीदार यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन अर्बन बँक महिला ठेवीदारांच्यावतीने बबई वाळके, सुमन जाधव, भंडारे ताई आदींसह सर्व महिलांनी केले आहे.
