Ipl

Social | अंधश्रद्धाविरोधी वैज्ञानिक जाणीवांचे धडे; शासकीय अध्यापिका विद्यालयात शिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न

SubEditor | Dipak Shirasath

नाशिक | १५.३ | रयत समाचार

(Social) येथील जिल्हा कोर्टासमोरील शासकीय अध्यापिका विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पांतर्गत अध्यापिकांसाठी विशेष शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अध्यापिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विविध चमत्कारसदृश्य प्रयोगांचे प्रात्यक्षिक आणि त्यामागील वैज्ञानिक कार्यकारणभाव समजावून सांगण्यात आला.

(Social) या प्रशिक्षणादरम्यान अध्यापिका विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेची बेडी सोडवणे, पाण्यावर दिवा पेटवणे, हवेत वस्तू तरंगवणे, हवेतून वस्तू काढणे, मंत्राने अग्नी पेटवणे, अफवांमागील मानसशास्त्र स्पष्ट करणे, तांब्यातून पुन्हा पुन्हा तीर्थ काढणे, दृष्टीभ्रम निर्माण करणे तसेच गडव्यात आभासी भूत गाडणे अशा चमत्कारसदृश्य प्रयोगांचे प्रात्यक्षिक स्वतः सादर केले. या प्रयोगांमागील वैज्ञानिक तत्त्वे आणि कार्यकारणभाव स्पष्ट करत अंधश्रद्धा कशी निर्माण होते व ती दूर करण्यासाठी वैज्ञानिक विचारसरणी किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

(Social) या प्रशिक्षण शिबिरात एकूण ७४ अध्यापिका उपस्थित होत्या. भविष्यात अध्यापिका विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रयोग सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणे समजावून सांगू शकतील, अशी तयारी शिबिरातून करून घेण्यात आली.

- Advertisement -
Ad image

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप प्रा. जयश्री साळुंखे यांनी केला.

शिबिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी.आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव आणि मोहन कादे यांनी मार्गदर्शन केले.

Share This Article