social | मराठा जनसंवाद दौरा : अभिमानास्पद व सुखद अनुभव

उपसंपादक | दिपक शिरसाठ

समाजसंवाद | २८ जानेवारी | पुरूषोत्तम खेडेकर

(social) जय जिजाऊ मित्रांनो, आम्ही काही सहकाऱ्यांनी दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान एक पूर्वनियोजित मराठा जनसंवाद दौरा वाशिम, हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात आयोजित केला होता. याचा धावता अहवाल आपणास मिळाला असावा. याच दौऱ्यात आम्हाला काही आश्चर्यजनक व अद्भुत, अभिमानास्पद व सुखद पण अत्यंत प्रेरणादायी अनुभव आले. ते आपल्या माहितीसाठी. सोयीचे असेल तर गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती व अपेक्षा आहे.

(social) १) आंबेडकरवादी मिशन नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्यक्षम प्रशासकीय आयएएस वा तत्सम केंद्र, राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी आल्याशिवाय मागासवर्गीय व बहुजन समाजाला न्याय मिळू शकणार नाही. अशी चिंता व्यक्त करणारे असंख्य लोक असतात, पण ते कृतीत आणणे अवघड असते. या पार्श्वभूमीवर नांदेड येथे आदरणीय शिवश्री दिपक कदम साहेब यांनी एमपीएससी मार्फत उपजिल्हाधिकारी निवड झालेली शासकीय नोकरी सोडून सिडको नांदेड परिसरात ‘आंबेडकरवादी मिशन’ सुरू केले. १५ पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. सुमारे ३०० पेक्षाजास्त सर्वसामान्य इच्छुक व गरजू तसेच होतकरू मुलेमुली तेथे निवासी शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

समाजातील दानशूर व्यक्ती आपापल्या परीने योगदान देतात. आतापर्यंत शेकडो अधिकारी या मिशनच्या माध्यमातून निवडलेले आहेत परंतू आम्ही या सेवाकेंद्रात पोचलो तेंव्हा शिवश्री दिपक कदम यांच्या वागणुकीत शून्य अहंकार व शतप्रतिशत नम्रता जाणवली.
(social) या ज्ञानकेंद्रात बहुजन समाजातील सर्वधर्म जातीजमातीच्या होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर कदाचित त्यांनी हेच सेवाकार्य हाती घेतले असते. भारत देश स्वतंत्र होण्याच्या मार्गावर असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. सी.डी देशमुख हे महाराष्ट्रातील वैचारिक अधिष्ठान असलेले लोकनेते दिल्ली दरबारात होते. त्यांनी मंथनातून एक महाराष्ट्र व बहुजन हिताच्या दृष्टीने दिल्ली येथे उच्च दर्जाचे प्रशासकीय अधिकारी निर्माण करण्यासाठी महाविद्यालय सुरू करण्याचा विचार केला होता, तर महाराष्ट्रात जन्मलेल्या होतकरू व बुध्दीमान महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांना निवड करुन दिल्लीत आणायचे. कारण खासदार व मंत्री नियोजन करुन पुढील कार्यवाही प्रशासकीय अधिकारी करतात ते जास्त काळ असतात. दिल्लीत मराठी अधिकारी अल्प प्रमाणात असतात. दुर्दैवाने ते मिशन प्रत्यक्षात आले नाही.
आदरणीय शिवश्री दिपक कदम साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन. कृपया अधिक माहितीसाठी मराठा सेवा संघाच्या नांदेड जिल्ह्यातील प्रमुख सहकाऱ्यांशी संपर्क साधावा.
२) बंजारा विरासत संग्रहालय, पोहरादेवी, ता. मानोरा, जिल्हा वाशिम – मराठा जनसंवाद दौरा निमित्ताने शेवटच्या दिवशी २४ जानेवारी रोजी आम्ही बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी येथे दुपारी पोचलो. आदरणीय इंजि. गिरीश जोशी साहेब मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम अमरावती, इंजि. शुभम जोशी कार्यकारी अभियंता वाशिम व अन्य सहकारी वाट पाहत होते. या परिसरात पाऊल टाकताच तेथील भव्यता व बाह्य सौंदर्य, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व परिसर पाहून अक्षरशः आमचा सर्व थकवा शिण कुठल्या कुठे पळून गेला. आम्ही महाराष्ट्राच्या एका बाजूला असलेल्या व शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात आहोत यावर विश्वास बसत नव्हता. समोर आश्चर्यकारक व अद्भुत बंजारा विरासत संग्रहालय इमारत नगारा रुपात उभी होती. गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्या दृष्टीने अमेरिका, युरोप, रशिया, आस्ट्रेलिया, आशिया, दुबई, अबुधाबी, सिंगापूर, गुजरात अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवीन पर्यटन केंद्रे निर्माण केले आहेत. तर बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरावे असे सांस्कृतिक अस्मितेचे प्रेरणादायी अभिमानास्पद संग्रहालय आहे. येथे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून साध्या सोप्या भाषेत जगभर पसरलेल्या बंजारा विरासत बाबतीत माहिती दिली आहे. या ३० मिटर उंचीच्या इमारतीचा आकार उलटा ठेवलेल्या नगाराचा आहे. तर एकूण आठ मजल्यांचे बांधकाम आहे. संग्रहालय अजून पर्यटकांसाठी खुले झाले नाही. तरीही आमची कर्नाटक, तेलंगणा राज्यातून आलेल्या शेकडो बंजारा बांधवांची भेट झाली. एकूण पाच मजल्यात विभागलेले हे संग्रहालय पर्यटकांना भुरळ घालते व मनोबल वाढवत सुखद अनुभव व आनंद देते. अधिकृतपणे लवकरच हे संग्रहालय सर्वांसाठी खुले होईल. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी जाणीवपूर्वक सहकुटुंब भेट द्यावी, अशी विनंती आहे. अस्मितेचे एक उच्चतम प्रदर्शन पहायला मिळते हे नक्की.
(social) भव्य दिव्य आणि विहंगम स्वप्ने पाहत जीवनभर एका काल्पनिक जगात वावरणारे अनेक लोक आहेत परंतू एखादी अतुलनीय संकल्पना उराशी बाळगून तिला मूर्त स्वरूप देण्याचे महत्भाग्य अगदीच अपवादात्मक व्यक्तींनाच लाभते. काही वर्षापूर्वी बंजारा समाज नेते स्मृतीशेष रामराव महाराज आमच्या प्रत्येक भेटीत बंजारा विरासत व बंजारा समाज जगभरातील ६० पेक्षाही जास्त देशात पसरलेला असल्याचे सांगत परंतू दुर्दैवाने अधिकृत भाषा व लिपी नाही, दस्तावेज नाहीत अशी खंत व्यक्त करत. या सर्वच उणिवा दूर करून बंजारा विरासत अभिमानाने आकाशाकडे झेप घेत उंचावली आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी निर्माणासाठी मा.ना. शिवश्री संजय राठोड साहेब यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, “एका बिजा केला नाश, मग भोगिले कणीस” आदरणीय मंत्री महोदय मा.ना. शिवश्री संजय राठोड साहेब यांनी बीजारोपण केले व त्याचे कणीस झालेले पाहीले. अभूतपूर्व घटना आहे. मा.ना. शिवश्री संजय राठोड साहेब यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना खूप खूप अभिनंदन व पुढील काळात सदिच्छा. केवळ बंजारा समाजच नाही तर सर्वच भारतीय रयत आपली ऋणी राहिल. जस्ट परफेक्ट व ग्रेट क्रिएशन सर. आम्हाला आपला अभिमान वाटतो.
मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की प्राचीन काळापासून भव्यदिव्य आणि विहंगम कलाकृती निर्माण करण्यासाठी शासक प्रयत्नशील असतात. परंतू त्यांच्या या अद्वितीय संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने त्यांना आकार लाभला नाही. आपल्या सर्वांच्या सुदैवाने बंजारा विरासत पोहरादेवी सांस्कृतिक संग्रहालय निर्मितीचे भव्य स्वप्न मंत्री महोदयांनी पाहिले व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अगदी शासकीय अधिकारी व यंत्रणा पुढे आली. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अमरावती पदावर कार्यरत असलेल्या शिवश्री इंजि. गिरीश जोशी व त्यांच्या अभियंता सहकाऱ्यांनी ही स्वप्नवत कल्पक वास्तू निर्माण करण्याची जबाबदारी स्वेच्छेने उचलून पार पाडली आहे. त्यासाठी सहकारी अभियंत्यांचे योगदान आहेच पण संकल्पना ते प्रारुप आराखडा प्रत्यक्षात आले ते केवळ इंजि.गिरीश जोशी साहेब यांच्याच अथक परिश्रमातून. इंजि. गिरीश जोशी साहेब यांचे आभार मानण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो व ऋणात राहू.
जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करावे, असे मत आहे. परंतू दुर्दैवाने राजकीय व आर्थिक मदत तसेच पाठबळ नाही. कुणबी मराठा समाजातील काही लोक अतिश्रीमंत आहेत पण सामाजिक, सांस्कृतिक वा ऐतिहासिक अस्मिता नाही. इंजि. गिरीश जोशी साहेब नियमितपणे जिजाऊ सृष्टीवर येतात व मदत करतात. सूचना करतात. दरम्यान त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी उभे राहिले. मा. प्रधानमंत्री यांनी त्याची प्रशंसा केली आहे. जिजाऊ सृष्टी उभारण्यासाठी बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी मार्गदर्शक ठरेल अशी सूचना मा. इंजि गिरीश जोशी साहेब यांनी केली. त्यानुसार आम्ही भेट दिली आणि अक्षरशः सर्वार्थाने तृप्त होऊन जड पावलांनी बाहेर पडलो. पुढील काळात पुन्हा जात राहू.
मित्रांनो, मला माहित आहे की, मी किंवा आपण आपल्या माध्यमातून सुमारे हजार कोटी रुपयांची जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे निर्माण करु शकणार नाही परंतू बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी सारख्या नयनरम्य वास्तूंना भेट दिल्याने आपल्या ज्ञानात व कल्पकतेत अधिक भर पडते. आत्मविश्वास बळावतो. यासाठीच पर्यटन केंद्रे विकसित केली जातात. आपण परदेशी किंवा दूर जाऊ शकत नाही. अशावेळी आपण आपल्या जवळील एका जागतिक स्थळाला भेट दिली पाहिजे.
(social) मित्रांनो, कदाचित आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की, सन २००० दरम्यान मी ठाणे येथे होतो. त्यावेळी उत्ताण या गावी आरएसएसचे अद्ययावत सुविधायुक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र जवळपास निर्माण झाले होते. मी ते बांधकाम सुरू असताना तीन वेळा गेलो होतो. इंजि. विनय सहस्रबुद्धे हे इन्चार्ज होते. त्यांनी दरवेळी आत्मियतेने व आपुलकीने सर्वच अंतर्बाह्य माहिती दाखवली व दिली. तसेच मराठा सेवा संघाचे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले. मी मराठा सेवा संघाच्या अनेक प्रमुख सहकाऱ्यांना मुद्दाम जाऊन आरएसएसचे म्हाळगी प्रबोधिनी उत्ताण पाहून यावे अशी विनंती केली होती. तेथेच जवळ न्यायाधीश प्रशिक्षण केंद्र आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. चांगले ते घ्यावे लागेल. वैयक्तिक जीवन समृद्ध होईल.
मित्रांनो, आपल्याकडे अनेक गप्पिष्ठ आहेत. त्यांचा सकाळचा चहा प्रधानमंत्री सोबत होतो. नाश्ता राष्ट्रपती सोबत. दुपारचे जेवण मुख्यमंत्री सोबत. सायं चहा विरोधी पक्षनेते सोबत. डिनर शरद पवारांच्या सोबत तर रात्रीचा मुक्काम वर्षा किंवा राजभवन !! असे शेकडो कुणबी मराठा गप्पिष्ठ व्यक्ती आहेत. मोठमोठ्या गप्पा मारायला अक्कल लागत नाही परंतू निर्माणासाठी सारेच लागते. मराठा सेवा संघ अशा ग्रेट लोकांच्या शोधात आहे. दरम्यान जिजाऊसृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे प्रस्तावित जिजाऊ स्मारक कसे असावे यावर विचार विनिमय करण्यासाठी, प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी स्वेच्छेने सहभाग देण्यासाठी सर्वांनाच धर्म, जात, पंथ, जमात या पलीकडे जाऊन सहकार्य करणारांचे मनःपूर्वक स्वागत आहे. सध्या इंजि. गिरीश जोशी साहेब यांनी पुढाकार घेतला आहे. जिजाऊ सर्वांनाच सद्बुद्धी देवो, हीच जिजाऊ चरणी प्रार्थना.
३) शेतकरीपुत्र प्रकाश मिसाळ – बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी येथे सायंकाळी पाहणी आटोपल्यावर चहापाणी करताना एक तरुण शेतकरी सुपुत्र भेटला, शिवश्री प्रकाश मिसाळ. मानोरा तालुक्यातील एका खेड्यातील. सध्या संभाजी ब्रिगेड मानोरा तालुकाध्यक्ष आहे. व्यवसाय उत्तम व फायदेशीर शेती. शिक्षण झाले आहे. खेड्यात राहतो. गाडी आहे. वडिलोपार्जित शेती आहे. सुमारे वीस एकर. काही जिरायती व थोडी बागाईत. दोन भाऊ. आई. गावात टूमदार घर आहे. संडास बाथरुम आहे. दोघांचेही लग्न झाले आहे. शिवश्री प्रकाश मिसाळ व बायको आनंददायी जीवन जगत आहेत. एक मुलगी आहे. सामाईक कुटुंब आहे. दोघे भाऊ मेहनती व निर्व्यसनी आहेत. दोघांनाही लग्नासाठी थोडीही वणवण करावी लागली नाही. शिकलेली शहरी भागातील बायको आहे. पाणी आणून व अडवून संत्रा बाग चार एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून शेती करतात. शिवश्री प्रकाश मिसाळ याची धडपड पाहून सासऱ्याला अभिमान वाटला व त्यास आर्थिक स्वरूपात मोठी भेट दिली.
शिवश्री प्रकाश मिसाळ या संभाजी ब्रिगेडच्या तरुणांपासून अविवाहित व मेहनती, निर्व्यसनी युवकांनी वैचारिक व कृतिशील प्रेरणा घेऊन निराश न होता आपल्या साथीदाराचा शोध घेतला पाहिजे. मित्रांनो, कोणत्याही बायकोला बेरोजगार, गप्पिष्ठ, गावंढळ, दुर्व्यसनी, बेशिस्त, खर्चिक वृत्तीचा, भांडखोर, पान तंबाखू गुटखा खाऊन जिकडे तिकडे थुंकणारा नवरा आवडत नाही. कमी शेती, चांगले घर, संडास बाथरुम सोय, मेहनती व कष्टाळू मुलगा, कामापुरते उत्पन्न, बचतीची सवय असेल तर उच्चशिक्षित आणि शहरातील मुली देखील खेड्यातील शेतकरी मुलांसोबत थाटामाटात लग्न करून संसार करायला तयार आहेत.
अविवाहित व हताश झालेल्या सर्वच शेतकरी तरुणांनो, कृपया गंभीरपणे विचार करून सांगा की, तुमच्या जवळच्या बेरोजगार व खर्चिक मित्रांसोबत तुम्ही तुमच्या बहिणीचे लग्न लावून देणार काय ? मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षांपासून आम्ही सांगत आलोय की, तरुणांनो तुम्हाला आवडेल तो बुट पॉलिश ते डोके मालिश धंदा करा. स्वबळावर उभे रहा. लोक काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका. चांगले रहावे.‌ नवनवे विचार करून योग्य बदल करावेत. कंपनी मित्र परिवार चांगले राहील याची काळजी घ्यावी. आर्थिक बाजू बळकट राहील याची काळजी घ्यावी. मेहनत करून प्रामाणिक प्रयत्न करत पुढे जावे. नो चूकार वा टूकारपणा. अशाच तरुणांना मुली पसंत करतात. नाहीतर लग्न अवघड आहे. आपलाच एक शेतकरी तरुण शिवश्री प्रकाश मिसाळ याचे उदाहरण प्रेरणादायी आहे. तेंव्हा खरोखरच चांगली व आनंदी सुखी समृध्द संपन्न संसार उभा करणारी बायको पाहिजे असेल तर उठा नि अविवाहित व चांगल्या मुलींच्या मनात भरण्यासाठी सज्ज व्हा. पोरींना गरीबीची व शेतकऱ्यांची चिड नाही तर भंकसगिरी, मोकाटगिरी करणाऱ्या पोरांची चिड आहे.
कृपया, पटत असेल तर बदला.
खूप खूप शुभेच्छा.
कृपया पटले तर अनावश्यक पोचपावती न देता इतरांना सांगावे, हीच विनंती. संपर्क : ९८२३६९३२२७
(लेखक मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत)social

हे ही वाचा : history | खोटारडेपणा किती? ‘लोकसत्ता’चा पोस्टमार्टेम !

Contents
समाजसंवाद | २८ जानेवारी | पुरूषोत्तम खेडेकर(social) जय जिजाऊ मित्रांनो, आम्ही काही सहकाऱ्यांनी दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान एक पूर्वनियोजित मराठा जनसंवाद दौरा वाशिम, हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात आयोजित केला होता. याचा धावता अहवाल आपणास मिळाला असावा. याच दौऱ्यात आम्हाला काही आश्चर्यजनक व अद्भुत, अभिमानास्पद व सुखद पण अत्यंत प्रेरणादायी अनुभव आले. ते आपल्या माहितीसाठी. सोयीचे असेल तर गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती व अपेक्षा आहे.(social) १) आंबेडकरवादी मिशन नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्यक्षम प्रशासकीय आयएएस वा तत्सम केंद्र, राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी आल्याशिवाय मागासवर्गीय व बहुजन समाजाला न्याय मिळू शकणार नाही. अशी चिंता व्यक्त करणारे असंख्य लोक असतात, पण ते कृतीत आणणे अवघड असते. या पार्श्वभूमीवर नांदेड येथे आदरणीय शिवश्री दिपक कदम साहेब यांनी एमपीएससी मार्फत उपजिल्हाधिकारी निवड झालेली शासकीय नोकरी सोडून सिडको नांदेड परिसरात ‘आंबेडकरवादी मिशन’ सुरू केले. १५ पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. सुमारे ३०० पेक्षाजास्त सर्वसामान्य इच्छुक व गरजू तसेच होतकरू मुलेमुली तेथे निवासी शिक्षणाचा लाभ घेत आहेत.समाजातील दानशूर व्यक्ती आपापल्या परीने योगदान देतात. आतापर्यंत शेकडो अधिकारी या मिशनच्या माध्यमातून निवडलेले आहेत परंतू आम्ही या सेवाकेंद्रात पोचलो तेंव्हा शिवश्री दिपक कदम यांच्या वागणुकीत शून्य अहंकार व शतप्रतिशत नम्रता जाणवली.(social) या ज्ञानकेंद्रात बहुजन समाजातील सर्वधर्म जातीजमातीच्या होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर कदाचित त्यांनी हेच सेवाकार्य हाती घेतले असते. भारत देश स्वतंत्र होण्याच्या मार्गावर असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. सी.डी देशमुख हे महाराष्ट्रातील वैचारिक अधिष्ठान असलेले लोकनेते दिल्ली दरबारात होते. त्यांनी मंथनातून एक महाराष्ट्र व बहुजन हिताच्या दृष्टीने दिल्ली येथे उच्च दर्जाचे प्रशासकीय अधिकारी निर्माण करण्यासाठी महाविद्यालय सुरू करण्याचा विचार केला होता, तर महाराष्ट्रात जन्मलेल्या होतकरू व बुध्दीमान महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांना निवड करुन दिल्लीत आणायचे. कारण खासदार व मंत्री नियोजन करुन पुढील कार्यवाही प्रशासकीय अधिकारी करतात ते जास्त काळ असतात. दिल्लीत मराठी अधिकारी अल्प प्रमाणात असतात. दुर्दैवाने ते मिशन प्रत्यक्षात आले नाही.आदरणीय शिवश्री दिपक कदम साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन. कृपया अधिक माहितीसाठी मराठा सेवा संघाच्या नांदेड जिल्ह्यातील प्रमुख सहकाऱ्यांशी संपर्क साधावा.२) बंजारा विरासत संग्रहालय, पोहरादेवी, ता. मानोरा, जिल्हा वाशिम – मराठा जनसंवाद दौरा निमित्ताने शेवटच्या दिवशी २४ जानेवारी रोजी आम्ही बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी येथे दुपारी पोचलो. आदरणीय इंजि. गिरीश जोशी साहेब मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम अमरावती, इंजि. शुभम जोशी कार्यकारी अभियंता वाशिम व अन्य सहकारी वाट पाहत होते. या परिसरात पाऊल टाकताच तेथील भव्यता व बाह्य सौंदर्य, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व परिसर पाहून अक्षरशः आमचा सर्व थकवा शिण कुठल्या कुठे पळून गेला. आम्ही महाराष्ट्राच्या एका बाजूला असलेल्या व शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात आहोत यावर विश्वास बसत नव्हता. समोर आश्चर्यकारक व अद्भुत बंजारा विरासत संग्रहालय इमारत नगारा रुपात उभी होती. गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्या दृष्टीने अमेरिका, युरोप, रशिया, आस्ट्रेलिया, आशिया, दुबई, अबुधाबी, सिंगापूर, गुजरात अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवीन पर्यटन केंद्रे निर्माण केले आहेत. तर बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरावे असे सांस्कृतिक अस्मितेचे प्रेरणादायी अभिमानास्पद संग्रहालय आहे. येथे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून साध्या सोप्या भाषेत जगभर पसरलेल्या बंजारा विरासत बाबतीत माहिती दिली आहे. या ३० मिटर उंचीच्या इमारतीचा आकार उलटा ठेवलेल्या नगाराचा आहे. तर एकूण आठ मजल्यांचे बांधकाम आहे. संग्रहालय अजून पर्यटकांसाठी खुले झाले नाही. तरीही आमची कर्नाटक, तेलंगणा राज्यातून आलेल्या शेकडो बंजारा बांधवांची भेट झाली. एकूण पाच मजल्यात विभागलेले हे संग्रहालय पर्यटकांना भुरळ घालते व मनोबल वाढवत सुखद अनुभव व आनंद देते. अधिकृतपणे लवकरच हे संग्रहालय सर्वांसाठी खुले होईल. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी जाणीवपूर्वक सहकुटुंब भेट द्यावी, अशी विनंती आहे. अस्मितेचे एक उच्चतम प्रदर्शन पहायला मिळते हे नक्की.(social) भव्य दिव्य आणि विहंगम स्वप्ने पाहत जीवनभर एका काल्पनिक जगात वावरणारे अनेक लोक आहेत परंतू एखादी अतुलनीय संकल्पना उराशी बाळगून तिला मूर्त स्वरूप देण्याचे महत्भाग्य अगदीच अपवादात्मक व्यक्तींनाच लाभते. काही वर्षापूर्वी बंजारा समाज नेते स्मृतीशेष रामराव महाराज आमच्या प्रत्येक भेटीत बंजारा विरासत व बंजारा समाज जगभरातील ६० पेक्षाही जास्त देशात पसरलेला असल्याचे सांगत परंतू दुर्दैवाने अधिकृत भाषा व लिपी नाही, दस्तावेज नाहीत अशी खंत व्यक्त करत. या सर्वच उणिवा दूर करून बंजारा विरासत अभिमानाने आकाशाकडे झेप घेत उंचावली आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी निर्माणासाठी मा.ना. शिवश्री संजय राठोड साहेब यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, “एका बिजा केला नाश, मग भोगिले कणीस” आदरणीय मंत्री महोदय मा.ना. शिवश्री संजय राठोड साहेब यांनी बीजारोपण केले व त्याचे कणीस झालेले पाहीले. अभूतपूर्व घटना आहे. मा.ना. शिवश्री संजय राठोड साहेब यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना खूप खूप अभिनंदन व पुढील काळात सदिच्छा. केवळ बंजारा समाजच नाही तर सर्वच भारतीय रयत आपली ऋणी राहिल. जस्ट परफेक्ट व ग्रेट क्रिएशन सर. आम्हाला आपला अभिमान वाटतो.मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की प्राचीन काळापासून भव्यदिव्य आणि विहंगम कलाकृती निर्माण करण्यासाठी शासक प्रयत्नशील असतात. परंतू त्यांच्या या अद्वितीय संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने त्यांना आकार लाभला नाही. आपल्या सर्वांच्या सुदैवाने बंजारा विरासत पोहरादेवी सांस्कृतिक संग्रहालय निर्मितीचे भव्य स्वप्न मंत्री महोदयांनी पाहिले व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अगदी शासकीय अधिकारी व यंत्रणा पुढे आली. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अमरावती पदावर कार्यरत असलेल्या शिवश्री इंजि. गिरीश जोशी व त्यांच्या अभियंता सहकाऱ्यांनी ही स्वप्नवत कल्पक वास्तू निर्माण करण्याची जबाबदारी स्वेच्छेने उचलून पार पाडली आहे. त्यासाठी सहकारी अभियंत्यांचे योगदान आहेच पण संकल्पना ते प्रारुप आराखडा प्रत्यक्षात आले ते केवळ इंजि.गिरीश जोशी साहेब यांच्याच अथक परिश्रमातून. इंजि. गिरीश जोशी साहेब यांचे आभार मानण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो व ऋणात राहू.जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करावे, असे मत आहे. परंतू दुर्दैवाने राजकीय व आर्थिक मदत तसेच पाठबळ नाही. कुणबी मराठा समाजातील काही लोक अतिश्रीमंत आहेत पण सामाजिक, सांस्कृतिक वा ऐतिहासिक अस्मिता नाही. इंजि. गिरीश जोशी साहेब नियमितपणे जिजाऊ सृष्टीवर येतात व मदत करतात. सूचना करतात. दरम्यान त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी उभे राहिले. मा. प्रधानमंत्री यांनी त्याची प्रशंसा केली आहे. जिजाऊ सृष्टी उभारण्यासाठी बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी मार्गदर्शक ठरेल अशी सूचना मा. इंजि गिरीश जोशी साहेब यांनी केली. त्यानुसार आम्ही भेट दिली आणि अक्षरशः सर्वार्थाने तृप्त होऊन जड पावलांनी बाहेर पडलो. पुढील काळात पुन्हा जात राहू.मित्रांनो, मला माहित आहे की, मी किंवा आपण आपल्या माध्यमातून सुमारे हजार कोटी रुपयांची जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे निर्माण करु शकणार नाही परंतू बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी सारख्या नयनरम्य वास्तूंना भेट दिल्याने आपल्या ज्ञानात व कल्पकतेत अधिक भर पडते. आत्मविश्वास बळावतो. यासाठीच पर्यटन केंद्रे विकसित केली जातात. आपण परदेशी किंवा दूर जाऊ शकत नाही. अशावेळी आपण आपल्या जवळील एका जागतिक स्थळाला भेट दिली पाहिजे.(social) मित्रांनो, कदाचित आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की, सन २००० दरम्यान मी ठाणे येथे होतो. त्यावेळी उत्ताण या गावी आरएसएसचे अद्ययावत सुविधायुक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र जवळपास निर्माण झाले होते. मी ते बांधकाम सुरू असताना तीन वेळा गेलो होतो. इंजि. विनय सहस्रबुद्धे हे इन्चार्ज होते. त्यांनी दरवेळी आत्मियतेने व आपुलकीने सर्वच अंतर्बाह्य माहिती दाखवली व दिली. तसेच मराठा सेवा संघाचे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले. मी मराठा सेवा संघाच्या अनेक प्रमुख सहकाऱ्यांना मुद्दाम जाऊन आरएसएसचे म्हाळगी प्रबोधिनी उत्ताण पाहून यावे अशी विनंती केली होती. तेथेच जवळ न्यायाधीश प्रशिक्षण केंद्र आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. चांगले ते घ्यावे लागेल. वैयक्तिक जीवन समृद्ध होईल.मित्रांनो, आपल्याकडे अनेक गप्पिष्ठ आहेत. त्यांचा सकाळचा चहा प्रधानमंत्री सोबत होतो. नाश्ता राष्ट्रपती सोबत. दुपारचे जेवण मुख्यमंत्री सोबत. सायं चहा विरोधी पक्षनेते सोबत. डिनर शरद पवारांच्या सोबत तर रात्रीचा मुक्काम वर्षा किंवा राजभवन !! असे शेकडो कुणबी मराठा गप्पिष्ठ व्यक्ती आहेत. मोठमोठ्या गप्पा मारायला अक्कल लागत नाही परंतू निर्माणासाठी सारेच लागते. मराठा सेवा संघ अशा ग्रेट लोकांच्या शोधात आहे. दरम्यान जिजाऊसृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे प्रस्तावित जिजाऊ स्मारक कसे असावे यावर विचार विनिमय करण्यासाठी, प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी स्वेच्छेने सहभाग देण्यासाठी सर्वांनाच धर्म, जात, पंथ, जमात या पलीकडे जाऊन सहकार्य करणारांचे मनःपूर्वक स्वागत आहे. सध्या इंजि. गिरीश जोशी साहेब यांनी पुढाकार घेतला आहे. जिजाऊ सर्वांनाच सद्बुद्धी देवो, हीच जिजाऊ चरणी प्रार्थना.३) शेतकरीपुत्र प्रकाश मिसाळ – बंजारा विरासत संग्रहालय पोहरादेवी येथे सायंकाळी पाहणी आटोपल्यावर चहापाणी करताना एक तरुण शेतकरी सुपुत्र भेटला, शिवश्री प्रकाश मिसाळ. मानोरा तालुक्यातील एका खेड्यातील. सध्या संभाजी ब्रिगेड मानोरा तालुकाध्यक्ष आहे. व्यवसाय उत्तम व फायदेशीर शेती. शिक्षण झाले आहे. खेड्यात राहतो. गाडी आहे. वडिलोपार्जित शेती आहे. सुमारे वीस एकर. काही जिरायती व थोडी बागाईत. दोन भाऊ. आई. गावात टूमदार घर आहे. संडास बाथरुम आहे. दोघांचेही लग्न झाले आहे. शिवश्री प्रकाश मिसाळ व बायको आनंददायी जीवन जगत आहेत. एक मुलगी आहे. सामाईक कुटुंब आहे. दोघे भाऊ मेहनती व निर्व्यसनी आहेत. दोघांनाही लग्नासाठी थोडीही वणवण करावी लागली नाही. शिकलेली शहरी भागातील बायको आहे. पाणी आणून व अडवून संत्रा बाग चार एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून शेती करतात. शिवश्री प्रकाश मिसाळ याची धडपड पाहून सासऱ्याला अभिमान वाटला व त्यास आर्थिक स्वरूपात मोठी भेट दिली.शिवश्री प्रकाश मिसाळ या संभाजी ब्रिगेडच्या तरुणांपासून अविवाहित व मेहनती, निर्व्यसनी युवकांनी वैचारिक व कृतिशील प्रेरणा घेऊन निराश न होता आपल्या साथीदाराचा शोध घेतला पाहिजे. मित्रांनो, कोणत्याही बायकोला बेरोजगार, गप्पिष्ठ, गावंढळ, दुर्व्यसनी, बेशिस्त, खर्चिक वृत्तीचा, भांडखोर, पान तंबाखू गुटखा खाऊन जिकडे तिकडे थुंकणारा नवरा आवडत नाही. कमी शेती, चांगले घर, संडास बाथरुम सोय, मेहनती व कष्टाळू मुलगा, कामापुरते उत्पन्न, बचतीची सवय असेल तर उच्चशिक्षित आणि शहरातील मुली देखील खेड्यातील शेतकरी मुलांसोबत थाटामाटात लग्न करून संसार करायला तयार आहेत.अविवाहित व हताश झालेल्या सर्वच शेतकरी तरुणांनो, कृपया गंभीरपणे विचार करून सांगा की, तुमच्या जवळच्या बेरोजगार व खर्चिक मित्रांसोबत तुम्ही तुमच्या बहिणीचे लग्न लावून देणार काय ? मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षांपासून आम्ही सांगत आलोय की, तरुणांनो तुम्हाला आवडेल तो बुट पॉलिश ते डोके मालिश धंदा करा. स्वबळावर उभे रहा. लोक काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका. चांगले रहावे.‌ नवनवे विचार करून योग्य बदल करावेत. कंपनी मित्र परिवार चांगले राहील याची काळजी घ्यावी. आर्थिक बाजू बळकट राहील याची काळजी घ्यावी. मेहनत करून प्रामाणिक प्रयत्न करत पुढे जावे. नो चूकार वा टूकारपणा. अशाच तरुणांना मुली पसंत करतात. नाहीतर लग्न अवघड आहे. आपलाच एक शेतकरी तरुण शिवश्री प्रकाश मिसाळ याचे उदाहरण प्रेरणादायी आहे. तेंव्हा खरोखरच चांगली व आनंदी सुखी समृध्द संपन्न संसार उभा करणारी बायको पाहिजे असेल तर उठा नि अविवाहित व चांगल्या मुलींच्या मनात भरण्यासाठी सज्ज व्हा. पोरींना गरीबीची व शेतकऱ्यांची चिड नाही तर भंकसगिरी, मोकाटगिरी करणाऱ्या पोरांची चिड आहे. कृपया, पटत असेल तर बदला. खूप खूप शुभेच्छा.कृपया पटले तर अनावश्यक पोचपावती न देता इतरांना सांगावे, हीच विनंती. संपर्क : ९८२३६९३२२७(लेखक मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत)


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading