मुंबई | २८.११ | रयत समाचार
(Rip news) मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नाटककार, लेखक व दिग्दर्शक गंगाराम गवाणकर यांचे अल्प आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले. ‘वस्त्रहरण’ या त्यांच्या गाजलेल्या नाटकामुळे ते रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे ‘वेडी माणसे’ हे पहिले नाटक होते.
(Rip news) गवाणकर यांनी आपल्या लेखणी आणि दिग्दर्शनातून मराठी रंगभूमीला नवे रूप दिले. सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध आणि समाजातील विसंगती यावर त्यांनी नेहमीच भाष्य केले. त्यांच्या नाटकांमध्ये हसवणूक आणि विचारप्रवर्तक आशय यांचा उत्तम संगम दिसतो.
(Rip news) ‘वस्त्रहरण’ या नाटकाने एक काळ गाजवला होता. या नाटकातील तीक्ष्ण संवादशैली, प्रखर सामाजिक भाष्य आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारा संदेश यामुळे गवाणकर यांची ख्याती राज्यभर पसरली. त्यांच्या ‘वर भेटू नका’, दोघी, वर परिक्षा, वात्रट मेले, वन रून किचन या नाटकांनाही प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी, नाटकप्रेमी आणि कलाजगताने एक जिवंत आणि प्रयोगशील कलाकार गमावला आहे. रंगभूमीवरील त्यांच्या योगदानाची नोंद सदैव घेतली जाईल. गवाणकर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रंगभूमीवरील त्यांच्या लेखणीचा प्रकाश कायम राहील.
