बीड|प्रतिनिधी |२० नोव्हेंबर २०२४
Rip News बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरू असतानाच उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. ते बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर ते थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन खाली पडले.
शिंदे यांना बीड शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात देखील दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.