छत्रपती संभाजीनगर | ५ जुलै | प्रतिनिधी
(Rip news) शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजीव राजळे यांना वडील तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, गंगापूरचे माजी आमदार अशोक पाटील डोणगावकर (वय ८०) यांचे निधन झाले. उद्या, रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते आजारी होते. १९७७ पासून ते राजकारणात आले. १९९५ ते १९९७ या काळात ते युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
(Rip news) अपक्षांचे नेते म्हणून त्यावेळी त्यांची ओळख होती. १९८० मध्ये त्यांनी काँग्रेसपक्षाकडून गंगापूरची निवडणूक लढविली होती. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी विमानतळावरच डोणगावर यांना उमेदवारी जाहीर केली होती. आधीचा उमेदवार बदलून डोणगावकर यांना संधी दिल्याने ही निवडणूक गाजली. त्यांनी ती जिंकत ३७ व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर बरीच पदे आणि राजकीय स्थित्यंतरे त्यांनी अनुभवली.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.