श्रीरामपूर | १५ सप्टेंबर | शफीक बागवान
तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा मतमाऊली भक्तिस्थान येथे ७६ वा मतमाऊली यात्राेत्सव मोठ्या भक्तिभावाने ६ लाखांच्यावर भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. Religion यात्रा दिनी सकाळी ८.३० वाजता प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, फा.फ्रान्सिस ओहोळ, फा.संतान, फा.प्रमोद मकासरे आदी धर्मगुरूंच्या उपस्थितीत जपमाळ. विधिवत पूजा करून फा.डॉमनिक, फा.संतान यांच्या हस्ते पवित्र मारीयेच्या शिरावर चांदीचा मुकुट चढवून यात्रेचा दर्शन रांगेने शुभारंभ झाला.
सकाळपासून हरिगाव फाटा ते चर्चपर्यंत हजारो भाविक पदयात्रेने येताना दिसत होते. भाविकांसाठी रस्त्याने अनेक ठिकाणी नाश्ता चहा, पिण्याचे पाणी आदी सुविधा करण्यात आली होती. चर्च परिसरात व गावातील रस्त्यावर विविध दुकाने, खेळणी दुकाने, हॉटेल्स थाटली होती. यावेळी अचानक भाविकांच्या सोयीसाठी असलेली एस.टी.सुविधा मात्र गैरसोयीची झाली. वर्षानुवर्षे पोस्टाजवळ बस स्थानकाची व्यवस्था होत असे.
यावेळी ब्राम्हणगाव फाट्यावर बसस्थानक केल्याने अपंग, महिला, बालके, वृद्ध महिला पुरुष यांना माऊलीच्या दर्शनासाठी अत्यंत हाल करून दर्शन घ्यावे लागले. त्या ठिकाणी लाईट व्यवस्था नाही. तहसीलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीत हरिगाव पोस्टाजवळ स्थानक ठेवायचे ठरले होते. प्रशासनास भाविकांची नाराजी पत्करावी लागली. फाट्यावर वाहनासाठी पार्किंग ठेवली परंतु सर्व वाहने पोलीस असताना दुसऱ्या बाजूने वाहने थेट गावात जात होती.
ता.६ जुलैपासून नऊ शनिवार नोव्हेना झाल्यावर यात्रेचा शुभारंभ ४ सप्टेंबर रोजी महागुरूस्वामी लूरडस डानियल यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाला. ता. ५ पासून ते यात्रेपर्यंत रोज नऊदिवस विविध धर्मगुरूंनी पवित्र मारिया जीवनावर प्रवचन केले. यात्रादिनी दुपारी ४.३० वाजता नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा.रे.डॉ.बार्थोल बरेटो यांचा पवित्र मारिया जीवनावर पवित्र मिस्सा बलिदान कार्यक्रम झाला. त्यास हजारो भाविक उपस्थिती होते.
यात्रा महोत्सवास आमदार लहू कानडे, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, हेमंत ओगले, अरुण पा.नाईक, संचालक करण ससाणे, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर ज्ञानेश्वर मुरकुटे, मा.सभापती वंदनाताई मुरकुटे व सुनिता गायकवाड सभापती सुधीर नवले, माजी चेअरमन सुरेश गलांडे, संचालक वीरेश गलांडे राजेंद्र पाअुलबुधे, पवन पाअुलबुधे, अमोल नाईक, सुभाष बोधक, जितेंद्र गोलवड, मिलिंद गायकवाड, भीमराज बागुल, गणेश मुद्गुले आदीनी मतमाऊलीचे दर्शन घेऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या.
यात्रेची सांगता रविवारी फा.भाऊसाहेब संसारे यांच्या प्रवचनाने सकाळी होणार आहे. रविवारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरु होणार आहे. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख धर्मगुरु डॉमनिक रोझारिओ व सर्व सहाय्यक धर्मगुरू यांनी केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.