मुंबई | १९ जून | प्रतिनिधी
(Public issue) राज्यातील ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यांमध्ये आज दिनांक १९ जून रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंत समुद्रात ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(Public issue) ही माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली असून, या कालावधीत लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
(Public issue) संबंधित जिल्हा प्रशासनांना खबरदारीचे उपाय करण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी समुद्राच्या दिशेने जाणे टाळावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
