Public issue | शिर्डीरोडच्या खड्ड्यांचे बळी; गणेशोत्सवाच्या गजरात जनतेचा आक्रोश कोण ऐकणार?

उपसंपादक | दिपक शिरसाठ

समाजसंवाद | ५ सप्टेंबर | दत्ता जोगदंड

(Public issue) नगर–मनमाड (शिर्डी) महामार्गाची साडेसाती कधी संपणार? असा सवाल आता जनतेच्या मनात उभा राहिला आहे. डिग्रस फाट्याजवळील खड्ड्यातून झालेल्या अपघातात राहुरीच्या सुभद्रा साहेबराव जगधने या ५० वर्षीय मातेचा मृत्यू झाला. हे केवळ एका कुटुंबाचे दुःख नाही, तर शासनाच्या उदासीनतेचे भयंकर दर्शन आहे. या महामार्गावर गेल्या काही वर्षांत चार ते हजार लोकांचा मृत्यू झाला. पत्रकार मनोज हासे यांचाही अपघात याच रस्त्यावर झाला होता. न्याय मिळाला नाही. प्रश्न सरळ आहे, लोकांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का?

(Public issue) ठेकेदार ‘मस्त’, आमदार-खासदार ‘व्यस्त’, जनता मात्र ‘त्रस्त’ : दरवेळी अपघात झाला की ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. पण ठेकेदार बदलत नाही, अधिकारी बदलत नाहीत आणि आमदार-खासदार मात्र केवळ घोषणाबाजी करतात. सत्तेत कोण आहे याचा काही फरक पडत नाही कारण सत्ताधारी असो वा विरोधक, सर्वच लोकप्रतिनिधी महामार्गाच्या प्रश्नावर मुके, बहिरे आणि आंधळे होतात. जनता मात्र रोज जीव मुठीत धरून खड्ड्यांतून जात असते.

(Public issue) गणेशोत्सवात राजकारणी व्यस्त : सध्या राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. लोकप्रतिनिधी या मंडपातून त्या मंडपात फेऱ्या मारत आहेत, आरत्या करत फिरत आहेत, फुलांच्या आरासीत, सीडीच्या दणदणाटात व्यस्त आहेत. पण जनतेच्या दैनंदिन विघ्नांचा विचार कुणी करत आहे? त्यांच्या स्वत:च्या राजकारणाचे विघ्न हरतील, पण लोकांच्या खड्ड्यांचे विघ्न कोण हरवणार?
हा सवाल आता लोकांकडून विचारला जावू लागला आहे.
संतापाची लाट : सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जनतेचा संयम आता संपत आला आहे. आज सुभद्रा जगधने गेल्या; उद्या आणखी कोण? हा प्रश्न प्रत्येकाला छळतो आहे.
जबाबदारीचे राजकारण नव्हे, उत्तरदायित्व हवे : या महामार्गावरील अपघात केवळ ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचे फलित नाहीत, तर प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या बेफिकीरीचेही परिणाम आहेत. अपघात होत राहतील, जीव जात राहतील आणि राजकारणी मात्र उत्सवात व घोषणांमध्ये गुंग असतील, ही स्थिती आता असह्य झाली आहे.
लोकप्रतिनिधींनी जर खरोखर जनता आपली आहे, असे मानायचे असेल, तर त्यांनी उत्सवाच्या गजरात थोडा वेळ काढून जनतेच्या आक्रोशालाही ऐकले पाहिजे. यावर तात्काळ मार्ग काढला पाहिजे. मनमाडरोड चांगला करून अपघातमुक्त केला पाहिजे.

हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी

Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

Share This Article