अहमदनगर | २६.३ | रयत समाचार
(Public issue) अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची कोणतीही टंचाई नसून तिन्ही प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडे पुरेसा साठा आणि नियमित पुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
(Public issue) अलीकडे काही ठिकाणी इंधन टंचाईबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे, जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणतीही कमतरता नाही.
(Public issue) जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, चुकीच्या व अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. तसेच विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करून परिस्थिती बिघडवू नये.
प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नमूद केले आहे.

