press: शनिचौकातील विजयस्तंभाला 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मानवंदना

उपसंपादक | दिपक शिरसाठ

 राहुरी | २६ जानेवारी | नाना जोशी

(press) शहरातील शनिचौकातील विजयस्तंभाला आज ता. २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक्टीव्ह मराठी न्युज परिवार व फ्रीडम पाॅवर पत्रकार संघटनेच्या वतीने विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली.

(press) विजयस्तंभाला पुष्पहार घालून सर्व महामानवांना अभिवादन करत घोषणा देण्यात आल्या. प्रजासत्ताक दिन आनंदी व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.

(press)यावेळी साप्ताहिक निळा प्रहारचे संपादक तथा संस्थापक अध्यक्ष अनुसंगम शिंदे, एक्टीव्ह मराठी न्युजचे संपादक तथा संस्थापक अध्यक्ष उमेश साठे, फ्रीडम पाॅवर पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ता जोगदंड, तालुका उपाध्यक्ष देवेंद्र शिंदे, तालुका उपाध्यक्ष नाना जोशी, तालुका उपाध्यक्ष दिनेश गायकवाड, एक्टीव्ह मराठी न्युजचे उत्तर विभागीय संचालक चंद्रशेखर दिघे, प्रविण जाधव, दीपक गुलदगड, दीपक साळवे, विठ्ठल शेळके, परवेज अत्तार, चंद्रकांत जगधने, राष्ट्रीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकूंद जगधने, तसे राहुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक साळवे, नगरपालिकेचे कर्मचारी वैद्य आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी विजयस्तंभाला मानवंदना देऊन ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

हे हि वाचा : आम्ही भारताचे लोक : गरज आहे ‘संविधान साक्षर’ समाज निर्मितीची – सॅम्युअल वाघमारे


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading