(Press) जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजना, उपक्रम, सरकारी निर्णय आणि जनहिताच्या माहितीचा अधिकृत व विश्वासार्ह स्त्रोत म्हणून ‘जिल्हा माहिती अधिकारी, अहिल्यानगर’ कार्यालयाने नागरिकांसाठी आपले अधिकृत फेसबुक पेज सुरू केले आहे.
(Press) नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवा, चुकीची माहिती किंवा अपूर्ण अपडेट्सपासून वाचवण्यासाठी आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व कृती पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हे फेसबुक पेज उपयुक्त ठरणार आहे.
(Press) यामध्ये जिल्ह्यातील विकासकामे, आपत्कालीन सूचना, महत्त्वपूर्ण सरकारी घोषणा, योजनांचे लाभ, शासकीय उपक्रमांची छायाचित्रे, व्हिडीओ, तसेच जिल्हा प्रशासनाशी संबंधित सर्व ताज्या अपडेट्स वेळोवेळी प्रकाशित करण्यात येणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे, सोबतच्या QR कोड स्कॅन करून किंवा येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून या अधिकृत फेसबुक पेजला त्वरित फॉलो करावे, जेणेकरून खरी व वस्तुनिष्ठ माहिती थेट जिल्हा प्रशासनाकडून मिळू शकेल. फेसबुक लिंक: https://www.facebook.com/share/1AqS5dKu2m/