Politics | प्रहार संघटनेचे नेवासा फाट्यावर ‘चक्काजाम’ आंदोलन; शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

Politics

नेवासा | १३ जून | प्रतिनिधी

(Politics) प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे शनिवारी, १४ जून रोजी सकाळी १० वाजता नेवासा फाटा येथे भव्य चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

(Politics) या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार असून, नेवासा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक पाटील भदगले यांनी नम्र आवाहन करत सांगितले की, “ही वेळ एकीची आणि लढ्याची आहे. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे आवश्यक बनले आहे.”

(Politics) शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गंभीर दखल घ्यावी यासाठी हे आंदोलन संयम व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले जाणार आहे.
‘चलो नेवासा फाटा’ हे या आंदोलनाचं ब्रीद ठरलं असून, तालुक्यातील जनतेचेही याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, अखेर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत बातचित करुन दिली.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *