नेवासा | १ सप्टेंबर | प्रतिनिधी
Politics अहमदनगर शिक्षकभारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रामराव काळे यांनी विद्यार्थ्यांना देखील आपल्या वाढदिवसाला झाड लावून त्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य राधा मोटे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पुराने, विनर करिअर अकॅडमीचे समन्वयक बाळासाहेब देशमुख, भगवान विरकर, गोवर्धन रोडे, हारिचंद्र माने, विनर करिअर अकॅडमीचे सर्व शिक्षकवृंद व ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.