Politics | खुद्द मनपाचे ‘आरोग्यमंदिर’ कचर्‍याचा ढिगार्‍यात; त्वरित उपाय न केल्यास धनंजय जाधवांचा आंदोलनाचा इशारा

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • Public issue

Politics

अहमदनगर | २१ मे | प्रतिनिधी

(Politics) सिद्धार्थनगरसारख्या दाट लोकवस्तीत साचलेल्या कचर्‍यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक धनंजय कृष्णा जाधव यांनी महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगेंना दिला.

 (Politics) माजी नगरसेवक जाधव यांनी आयुक्त डांगेंना दिलेल्या निवेदनात सांगितले की, प्रभाग क्रमांक ०९ मधील सिद्धार्थनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा न उचलल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या परिसरात पालिकेचे अनेक कर्मचारी वास्तव्यास असून, करंदीकर हॉस्पिटल व महानगरपालिकेचे आरोग्य मंदिरही याच परिसरात आहे.

(Politics) पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, “कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, अनेक नागरिक आजारी पडत आहेत.” आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणीच साचलेला कचरा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    “तत्काळ कचरा उचलण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे. अन्यथा नागरिकांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा धनंजय जाधव यांनी दिला.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *