नगरतालुका | ७ जून २०२५ | प्रतिनिधी
(Politics) तालुक्यातील वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप दत्तात्रय पवार यांची शिवसेना डॉक्टर सेल आयुष होमिओपॅथिक विंगचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य विस्तारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
(Politics) ही नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (एम.एस. ऑर्थो) यांच्या आदेशाने व शिवसेना डॉक्टर सेल प्रदेश प्रमुख डॉ. धनंजय पडवळ तसेच आयुष होमिओपॅथिक विंगचे प्रदेशप्रमुख डॉ. करणसिंह गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
(Politics) यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विकास मंत्री व अहिल्यानगरचे संपर्कमंत्री शंभुराजे देसाई, आमदार विठ्ठलराव लंघे, आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते डॉ. पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, डॉक्टर सेलचे जिल्हा संघटक डॉ. सचिन गोरे, नगर तालुका माजी सभापती रामदास भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, प्रकाश कुलट, उद्योजक गणेश लंघे, संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.
हे हि वाचा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
