श्रीरामपूर | १८ एप्रिल | सलीमखान पठाण
(Politics) तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भैरवनाथनगर ग्रामपंचायतीत आधार दिव्यांग संघटना राज्याध्यक्ष तथा प्रहार जनसेवक लक्ष्मणराव गोरखनाथ खडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकनियुक्त बिनविरोध सरपंच दिपालीताई फरगडे, उपसरपंच चंद्रभागा काळे यांच्या उपस्थितीत भैरवनाथनगर हद्दीतील अपंग व्यक्तीना अनुदानाचे धनादेश (चेक) वाटप करण्यात आले.
(Politics) या ग्रामपंचायत हद्दीतील अपंगाची नोंद ग्रामपंचायत कार्यालयाने केलेली आहे. प्रत्येक वर्षी दिव्यांगाना अनुदान दिले जाते त्याप्रमाणे या वर्षीही दिव्यांगाना अनुदानाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आधार दिव्यांग संघटना राज्याध्यक्ष तथा प्रहार जनसेवक लक्ष्मणराव खडके यांनी अपंगाविषयी असणाऱ्या अनेक योजनाची माहिती दिली. तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी शासनाच्या अनेक योजना असून जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने श्रीरामपूरमध्ये तलाठी कार्यालयाजवळ अपंग व्यक्तींसाठी दिव्यांग मंत्रालय सुरु करण्यात आलेले असून कुणालाही काही अडचण आल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन लक्ष्मणराव खडके यांनी केले.
(Politics) यावेळी ज्योती लाहोरे म्हणाल्या, भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपालीताई फरगडे या खूपच क्रियाशील सरपंच असून त्यांना दीड वर्षात तीन पुरस्कार मिळाले असून ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान दिले जाईल असे सुंदर नियोजन दिपालीताईंनी केलेले आहे. या योजनेचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.
पुढे दिपालीताई फरगडे म्हणाल्या, शासनाने दिव्यांगासाठी अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. या योजनाचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहचला पाहिजे यासाठी ग्रामपंचायत भैरवनाथनगर कटीबद्ध आहे. या योजनांसाठी काहीही अडचण आल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क करावा तसेच दिव्यांगांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी ५०% सवलत देण्यात येणार आहे, अशी घोषणा सरपंच फरगडे यांनी केली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे, कांता शेळके, पत्रकार स्वप्नील सोनार, भास्कर कदम, विठ्ठल लाहोरे, भानुदास थोरात, रामचंद्र लबडे, मधुकर लबडे, कांता कुमावत, नानासाहेब लबडे, राजेंद्र लबडे, सुशील लबडे, विलास होले, अनिल तुपे, सदाशिव उंदारे, शंतनू थोरात, सारंगधर कुमावत, अमोल तुवर, पोपट देवकर, राजेंद्र फरगडे, कैलास लबडे, राजेश शेळके, इंगळे, कांदळकर, लता अभंग, आशा करंडे, नंदा कांदे, वंदना कांदे, लक्ष्मी पांडे, रंजना सदाफुले, शीतल लबडे, शकुंतला दांडगे, बेबी फरगडे, सिंधू सूर्यवंशी, भागुबाई रुपटक्के, संगिता ब्राम्हणे, बाबीरवाल, प्रमिला सुलाखे, योगिता गोरे, जयश्री पाटील, नानासाहेब सुलाखे, अनिता होले, बबन लिहिणार, वैष्णव शिंदे, बापूसाहेब गाढे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब दिघे यांनी प्रास्ताविक तर उपस्थितीबद्दल सर्वाचे आभार खादी ग्रामोद्योगचे संचालक प्रविण फरगडे यांनी मानले.
हे ही वाचा : History | बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.