Ipl

Politics | अयातुल्ला खामेनी निधनावर मोदी सरकारचा अखेर शोक; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणी दूतावासात नोंदवली श्रद्धांजली

SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | ५.३ | रयत समाचार

(Politics) इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल मोदी सरकारने अखेर अधिकृत शोक व्यक्त केला. गुरुवारी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट देऊन शोकपुस्तिकेत स्वाक्षरी करत मोदी सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण केली.

(Politics) इराणच्या राजकीय आणि धार्मिक नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर अनेक देशांनी शोक व्यक्त केला होता. मात्र मोदी सरकारकडून तात्काळ प्रतिक्रिया न आल्याने देशांतर्गत स्तरावर सरकारवर टीकेची झोड उठली होती. सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत मोदी सरकारने अधिकृत शोकसंदेश द्यावा, अशी मागणी होत होती.

(Politics) या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणी दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेत नोंद करत मोदी सरकारची संवेदना व्यक्त केली. त्यांनी लिहिलेल्या संदेशात अयातुल्ला खामेनी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत इराणच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

- Advertisement -
Ad image

भारत आणि इराण यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक संबंध आहेत. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने व्यक्त केलेला हा शोक संदेश दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित करणारा मानला जात आहे.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

TAGGED:
Share This Article