Ipl

Politics | अपघाताबाबत अमेरिकन यंत्रणांनी माहिती मागितली असताना ती का दिली जात नाही- रोहित पवार; ब्लॅक बॉक्सवरून वाद

रोहित पवारांचा केंद्राला सवाल

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १७.३ | रयत समाचार

(Politics) अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात ब्लॅक बॉक्ससंदर्भात विरोधाभासी माहिती दिल्याचा आरोप करत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. ब्लॅक बॉक्स सुरक्षित असताना तो जळाल्याचे सांगितले जात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

(Politics) पवार यांनी म्हटले, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी पारदर्शक तपास सुरू असल्याचे सांगितले असले तरी अहमदाबाद येथील अपघाताबाबत अमेरिकन यंत्रणांनी माहिती मागितली असताना ती का दिली जात नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे.

(Politics) तसेच, या प्रकरणात काही खासगी कंपन्यांशी संबंधित हितसंबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी करत त्यांनी या विषयावर काँग्रेससह INDIA आघाडीतील पक्ष हा मुद्दा पुढे मांडतील, असे सांगितले.

- Advertisement -
Ad image

दरम्यान, विमान अपघातासारख्या संवेदनशील प्रकरणात पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

 

Share This Article