Politics | अजितदादांची ‘झापूक झुपूक’ पोस्ट अन् नेटकर्‍यांचा संताप!

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • Zapuk Zupuk

बारामती | १३ एप्रिल | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे दोन नंबरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फेसबुक सोशल मिडीया अकाउंट कोण हँडल करत आहे. हा प्रश्न नेटकर्‍यांचा आज पडलेला दिसत आहे. अनेक मंत्री व आमदारांना रा.स्व. संघाच्या (Politics) विचारांची टोळकी असलेली अनेकजण त्यांचे सोशल मिडीया अकाउंट्स हँडल करत असल्याचे पहाण्यात आले. त्याचे कारण म्हणजे आज ता.१३ रोजी दोन तासापुर्वी त्यांच्या Ajit Pawar या फेसबुवरून अकाउंटवरून सुरज चव्हाण या टिकटॉक तथा बिगबॉसस्टारच्या घराबद्दल पोस्ट करण्यात आली.

(Politics) ती अशी, “बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.📍बारामती”

ही पोस्ट प्रसिध्द झाल्याबरोबर अनेक नेटकर्‍यांनी संताप व्यक्त केला. त्यातील काहीजण हसत सुटले तर अनेकांनी ही पोस्ट लाईकसुध्दा केली.

राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, कामगार व सर्वसामान्यांचे अनके गंभीर प्रश्न असताना या (Politics) ‘चालू कामाची पहाणीची’ पोस्ट करणे गरजेचे होते का? असा अनेकांना प्रश्न पडला. अनेक शेतकरी, विनाअनुदानित शिक्षकांनी अक्षरश: आत्महत्या केल्या त्यांच्याकडे पहाणी करण्यास त्यांचे प्रश्न सोडविण्यास वेळ नसल्याची अनेकांनी कॉमेंटमधे तक्रार केली. संतोष देशमुख खुन प्रकरणात मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, असेही काहीजण म्हणाले. महाराष्ट्रातील जीवंत प्रश्नाला हात घातल्याबद्दल अभिनंदन, असेही काहीजण म्हणाले तर राष्ट्रीय प्रश्न सोडविल्याबद्दल आभार असेही काहींनी गंभीरपणे कॉमेंट केल्या आहेत.

यातील काही प्रातिनिधिक कॉमेंट येथे देण्यात येत आहेत.

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा – संजीव चांदोरकर

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *