(Politics) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे आदर्श सरपंच कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहमदनगर जिल्हास्तरीय मोर्चासाठी कोहिनूर मंगल कार्यालय गुलमोहोर, अहिल्याबाई होळकर मार्ग (पाईपलाईन रोड) अहमदनगर येथे ता.२२ मार्च रोजी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
(Politics) बैठकीसाठी संपूर्ण जिल्हा व तालुक्यातील मराठा जातीबांधव उपस्थित राहणार आहेत. कै. संतोष देशमुख यांची (Crime) केलेल्या क्रूर, अमानवीय हत्येबद्दल सर्व जाती समाजातील घटकांना चीड व संताप आहे. याबद्दल सर्वच जातीधर्मातील विविध संघटना, सामाजिक संघटना, व्यवसायिक संघटना सहभागी होण्यास तयार असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी सर्वांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
(Politics) भव्य मोर्चाच्या नियोजनासाठी समाजबांधवांची मते २२ रोजीच्या बैठकीत जाणून घेतली जाणार आहेत. त्यामुळे या बैठकीसाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने ॲड.अनुराधा येवले, संपूर्णा सावंत, कांता बोठे, संजीव भोर, निलेश म्हसे, राजेश परकाळे, राजेश सरमाने, राजेंद्र कर्डीले, भीमराज मोकाटे, सोमा माने, अशोक कुटे, मनोज सोनवणे, भरत मोरे, अशोक गाडे, विनय भगत, राजेन्द्र ससे आदींनी केले.