Politics | सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची मला माहिती नाही; शरद पवारांचे स्पष्टीकरण; पार्थ पवार बारामतीला रिटर्न

Subeditor | Dipak Shirasath

मुंबई | ३१.१ | रयत समाचार

(Politics) अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडताना खासदार शरद पवार यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. आज शपथविधी आहे, याचीही मला माहिती नव्हती.

(Politics) शरद पवार पुढे म्हणाले, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असू शकतो. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्या निर्णयाचा अधिकार त्यांचाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Politics) अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करताना पवार म्हणाले, अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे काय भूमिका घ्यावी, हे त्या पक्षातील नेते ठरवतील.
दरम्यान, छगन भुजबळ व सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याच्या वृत्तांबाबत विचारले असता शरद पवार यांनी ‘याबाबत मला कोणतीही कल्पना नाही’ असे स्पष्ट शब्दांत सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाविषयी बोलताना त्यांनी नमूद केले की, यापूर्वी सकारात्मक चर्चा झाली होती; मात्र सध्या त्या चर्चेला खंड पडला आहे.

या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि पुढील दिशा याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, काल रात्री आई सुनेत्रा यांच्यासोबत पार्थ मुंबईला गेले होते. आज सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी नियोजित आहे. याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे शरद पवार सकाळीच पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यामुळे पार्थ पवार पुन्हा बारामतीत येवून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार, असल्याचे कळते.
Share This Article