अहमदनगर | २३.१२ | रयत समाचार
(Politics) नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी उल्लेखनीय यश मिळवले. या निवडणुकीत जामखेड नगरपरिषदचे ॲड. अरुण जाधव, संगीताताई भालेराव, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे संतोष चोळके, संगमनेरनगर परिषदेचे अमजदखान उमरखान पठाण तसेच विजयाताई जयराम गुंजाळ हे नगरसेवकपदी निवडून आले आहेत.
या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार समारंभ बुधवारी ता. २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता, नीलक्रांती चौक, सिद्धी बागेसमोर, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला.
(Politics) या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण आणि राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे असणार आहेत.
(Politics) हा सत्कार समारंभ वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर जिल्हा, शहर व तालुका तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचे अनुयायी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन योगेश साठे आणि आयोजकांनी केले आहे.
