Politics | विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ‘नमो वक्तृत्व स्पर्धा’- ॲड. अभय आगरकर; सावेडी मंडलाचा स्तुत्य उपक्रम 

अहमदनगर | २० सप्टेंबर | रयत समाचार

(Politics) भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पेमराज सारडा महाविद्यालयात ‘नमो वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

(Politics) उद्घाटन करताना ॲड. अभय जगन्नाथ आगरकर म्हणाले, महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित होतात. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सातत्याने भाग घेऊन स्वतःला घडवले पाहिजे. सावेडी मंडलाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मी अभिनंदन करतो.

(Politics) आगरकर यांनी पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची घोडदौड सुरू असून लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा सावेडी मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर तथा राजेंद्र काळे यांनी या स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोदीजींच्या कारकिर्दीचा अभ्यास करून त्यांची दूरदृष्टी समजून घ्यावी. त्यातूनच त्यांना भविष्यात देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल.
यावेळी प्राचार्या माहेश्वरी गावित, उपप्राचार्य गिरीश पाखरे, प्रा. अविनाश झरेकर, निखिल वारे, युवानेते मयूर बोचुघोळ, शंतनू खानविलकर, महिला मोर्चा अध्यक्षा रेणुका करंदीकर, प्रियाताई जानवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. प्रसाद बेडेकर व प्रा. शशिकांत शिंदे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन हेमंत पवार यांनी तर आभार अनिरुद्ध घैसास यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रतिक्षा रसाळ, प्रज्ञा जोशी, सोनाली पाठक, साहिल शेख, पंडित वाघमारे, अभिजीत बोरुडे, महेश लोंढे यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Politics
प्राचार्या माहेश्वरी गावित आणि मान्यवर

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

Share This Article