मुंबई | प्रतिनिधी
(Politics) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायती राज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियान २०२२-२३ अंतर्गत राज्यभरातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना गौरविण्यात आले. यामध्ये पाथर्डी तालुक्याने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
(Politics) प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत पाथर्डी तालुक्यात शासनाच्या नियोजनाचा उत्कृष्ट व प्रभावी अंमलबजावणीद्वारे सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यात आले. या कामगिरीबद्दल पाथर्डी तालुक्याला ‘सर्वोत्कृष्ट तालुका’ म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
(Politics) या गौरव सोहळ्यात केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यशानंतर आमदार मोनिकाताई राजळे यांनी पाथर्डी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि या अभियानात सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत म्हणाल्या की,
“प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वसामान्य नागरिकाच्या हक्काच्या घरासाठीची संधी आहे. पाथर्डी तालुक्याने ती योग्य प्रकारे यशस्वी केली, हे अभिमानास्पद आहे.”
या सन्मानामुळे पाथर्डी तालुक्याच्या शासकीय यंत्रणेचा उत्साह वाढला असून, भविष्यात अशाच योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रेरणा मिळाली आहे.
