मुंबई | ३१ मार्च | प्रतिनिधी
(politics) महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी २२ एप्रिल रोजी राज्यातील जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयावर आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव ॲड. कॉ. सुभाष लांडे यांनी दिली.
(politics) अधिक माहिती देताना ते म्हणाले, ऑनलाईन मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे ता.२८ मार्च रोजी मुंबई येथे डाव्या प्रागतिक पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला भाकप, माकप, शेकाप, लाल निशाण पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, अखिल भारतीय जनवादी महीला संघटना, भारत जोडो अभियान, कामगार एकता कमिटी, नारी अत्याचार विरोधी मंच आदी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी सहभागी होते. कॉ. ॲड. सुभाष लांडे, कॉ. डॉ. अजित नवले, कॉ. सुकुमार दामले, भाई ॲड. राजेंद्र कोरडे, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. डॉ. एस.के रेगे, कॉ. चारुल जोशी, कॉ. गिरीश भावे, कॉ. लता भिसे सोनवणे, डॉ. अनुराधा रेड्डी, संध्या गोखले, सुजाता गोठुसकर, सुर्यकांत के शिंगे, कॉ. प्रा. सुभाष जाधव, संकल्पना कऱ्हाडे चौधरी, प्राची हातिवलेकर, गणेश बाईत, सुनिल मनवर आदी प्रमुख उपस्थित होते.
(politics) महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ या विषयावर सविस्तर चर्चा झाली. या जनविरोधी विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व लोकशाहीवादी पक्ष व संघटनांना अपिल करण्यात यावे, तातडीने कृती कार्यक्रम हाती घेण्यात यावा असे ठरले. त्याप्रमाणे ता.२२ एप्रिल रोजी राज्यातील तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात यावा. विभागीय मेळावे घेऊन या विधेयकाला विरोध का करायचा या बाबतीत जनतेपर्यंत माहिती पोहोचवली जावी व जनमत तयार करावे. ३० जून रोजी मुंबई येथे सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व ताकदीनिशी विराट मोर्चा काढून तीव्र विरोध करावा. या विधेयकाला विरोध करणाऱ्या सर्व पक्ष व संघटनांची ‘जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती’
(politics) या नावाने सर्व कृती कार्यक्रम करावे. सोशल मीडियामधून प्रचार प्रसार करण्यात यावा, जेणेकरून जनमानसात या जनविरोधी, घटनाविरोधी विधेयकाला सर्व स्तरातून विरोध झाला पाहिजे. या दरम्यान सर्व आमदारांच्या घरावर, कार्यालयावर जाऊन हे विधेयक मागे घेण्यात यावे, रद्द करावे म्हणून विधानसभा, विधान परिषदेत भुमिका मांडावी अशी आग्रही मागणी करावी असे ठरल्याची माहिती जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.
हे ही वाचा : कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक
हे हि वाचा : politics | शहरात शहीद दिनी विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 ची भाकपच्या वतीने होळी