(politics) पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिर परिसराजवळ उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकासह मास्टरमाईंडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून भरचौकात फाशी किंवा एन्काऊंटर करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालय व डीवायएसपी कार्यालयासमोर २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन, तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ शिरसाठ यांनी दिली.
(politics) अधिक माहिती देताना ते म्हणाले, ज्या सुवर्ण दिवशी संपूर्ण भारत देश ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना तसेच ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, त्या महामानवाचा आणि भारतीय संविधानाचा देशभरात गौरव होत असताना डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची याच दिवशी देशद्रोही व समाजकंटकाने विटंबना केली, हे कृत्य अत्यंत वाईट आहे.
(politics) आंदोलनासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, विभागीय जिल्हाप्रमुख भीमाभाऊ बागुल, शहराध्यक्ष विजय पवार, जिल्हा संघटक राजूनाना गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, योगेश बनसोडे, राजू मगर, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमाताई धीवर, जिल्हा सरचिटणीस मनोज काळे, तालुका कार्याध्यक्ष अंतोन शेळके, तालुका संघटक संजय बोरगे, युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, रिपाई नेते रमेश अमोलिक, प्रदीप कदम, सोनू राठोड, मोजेस चक्रनारायण, प्रदीप गायकवाड, हितेश पवार, आबा रणनवरे, बंडू सुतार, अजय शिंदे आदींनी केले.