अहमदनगर | २२ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Politics विधानसभा निवडणुकीसाठी राहुरी पाथर्डी नगर मतदार संघातील रा.स्व.संघ भाजपचे उमेदवार शिवाजी भानुदास कर्डिले व अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी अजित पवारचे उमेदवार संग्राम जगताप यांनी निवडणूक लढवली. निकालाआधीच शहरात ठिकठिकाणी जय मातादी ग्रुपच्या वतीने सासरे जावई यांच्या विजयाचे व अभिनंदनाचे फलक झळकले. ते फलक नागरिकांचे आकर्षण ठरले.
शुभेच्छुक म्हणून बुरुडगावचे संकेत कुलट, नवनाथ वाघ, खंडू काळे, महेश निमसे, बापू अवताडे, सोमनाथ तांबे, किशोर कुलट, पप्पू कुलट यांचे फोटो झळकले आहे.
नागरिकांशी असलेला थेट संपर्क आणि सुखदुःखात सामील होऊन जनतेशी असलेले प्रेम पाहता. या माध्यमातून नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण झाला असल्यामुळे मतदारांनी शिवाजी कर्डिले व संग्राम जगताप यांना मतरूपी आशीर्वाद दिले. त्यामुळे त्यांचा Politics विजय निश्चित झाला असल्याचे मत बुरूडगावचे नवनाथ वाघ यांनी व्यक्त केले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
