politics: शेवटच्‍या शेतकऱ्याला पाणी नियोजन करा – महसूलमंत्री विखे

59 / 100 SEO Score

शिर्डी | ११ ऑगस्ट | शफीक बागवान

politics निळवंडे धरणातून उच्‍चस्‍तरीय कालव्‍यांसह डाव्‍या आणि उजव्‍या कालव्‍यांचे पूजन करुन पाणी सोडण्‍यात आले. ओव्‍हरफ्लोच्‍या पाण्‍याचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रथमच लाभ होत आहे, ही अतिशय समाधानाची बाब असून लाभक्षेत्रातील शेवटच्‍या शेतकऱ्याला पाणी मिळेल, असे नियोजन करण्‍याच्‍या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे यांनी जलसंपदा विभागाच्‍या आधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत.

निळवंडे धरण स्‍थळावर पालकमंत्री विखे यांच्‍या उपस्थितीत जलपुजन करण्‍यात आले. माजी आमदार वैभव पिचड, सिताराम गायकर यांच्‍यासह जलसंपदा विभागाचे वरिष्‍ठ आधिकारी आणि लाभक्षेत्रातील शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. मागील आठवड्यात धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रामध्‍ये पावसाने चांगली हजेरी लावण्‍याने निळवंडे धरणातून ओव्‍हर फ्लोचे पाणी सोडण्‍याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. ओव्‍हर फ्लोचे पाणी कालव्‍याना सोडावे. अशा सूचना पालकमंत्री विखे यांनी दिल्या होत्‍या.

यावेळी विखे म्‍हणाले, कालव्‍यांमध्‍ये पाणी सोडण्‍याचा हा आनंददायी क्षण आहे. ओव्‍हरफ्लोचे पाणी प्रथमच सोडण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. निळवंडे प्रकल्‍पाचा एकत्रित आढावाही त्‍यांनी आधिकाऱ्यांकडून घेतला. शेतकऱ्यांना पाणी मिळेल यासाठी सर्व उपाययोजना सुरु करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले असून, बंधिस्‍त नलिका वितरण प्रणालीच्‍या कामासाठी जलसंपदा‍ विभागाने काढली असून, संपुर्ण लाभक्षेत्रासाठी बंधिस्‍त नलिका वितरण प्रणालीतून पाणी देण्‍याचा निर्णय झाला असल्‍याचे विभागाच्‍या वतीने सांगण्‍यात आले यामुळे शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणीपुरवठा होवू शकेल.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *