संगमनेर | १६ सप्टेंबर | रजत अवसक
तालुक्यातील घुलेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराणा कुटुंब फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विजय पवार यांची मागासवर्गीय Politics युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्य सुरू आहे.
अनेक वर्षांपासून डॉ.पवार हे सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग होत असतात. शिवराणा कुटुंब फौंडेशनच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क असून ते आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, पर्यावरण आदी उपक्रम राबवत असतात. याच कार्याची दाखल घेत त्यांची नियुक्त करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा तळागाळातील सर्वसामान्य नागरिकात पोहचवण्याचा मानस डॉ.पवार यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल संगमनेर मधील तरुणाईमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निवडीबद्दल त्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, टायगर ग्रुप संगमनेर तालुकाध्यक्ष विनोद जोंधळे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिनंदन केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.