Politics: उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निवासी मूकबधिर विद्यालयात स्नेहभोजसह वृक्षारोपणाचे आयोजन

20 / 100 SEO Score

पाथर्डी | तुषार सोनवणे

येथील निवासी मूकबधिर विद्यालयात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी वृक्षलागवडीचे महत्व पटवून दिले तर युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रशांत भाले यांनी युवा सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना संघटन मजबुतीसाठी काम करण्याच्या सूचना केल्या तसेच शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अंबादास शिंदे यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील सहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला.PSX 20240722 204052
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, ज्येष्ठ शिवसैनिक नवनाथ चव्हाण, संतोष मेघुंडे, नवनाथ वाघ, पाथर्डी तालुकाध्यक्ष आकाश म्हस्के, शेवगाव तालुकाध्यक्ष अक्षय बोडखे, उपतालुकाप्रमुख किशोर गाडेकर, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन युवासेनेचे सचिन नागापुरे यांनी तर शिक्षकसेना तालुकाध्यक्ष नंदकुमार डाळींबकर यांनी आभार मानले.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *